शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

दहा वर्षांनंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे फिरते खंडपीठ पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 9:53 PM

दहा वर्षांनंतर हे फिरते खंडपीठ पुण्यात आले असून 11 ते 15 मार्च दरम्यान खंडपीठाचे कामकाज चालणार आहे.

पुणे : दहा वर्षांनंतर हे फिरते खंडपीठ पुण्यात आले असून 11 ते 15 मार्च दरम्यान खंडपीठाचे कामकाज चालणार आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या फिरत्या खंडपीठाचे कामकाज आझम कॅम्पसमधील लॉ कॉलेजमधील म्यूट कोर्ट येथे सोमवारी सुरु झाले.  सकाळी साडे दहा ते साडेपाच या वेळेत राष्ट्रीय खंडपीठाचे कामकाज चालणार आहे. खटल्यांची सुनावणी न्यायीक सदस्य दीपा शर्मा, सदस्य अनुप ठाकूर यांच्या समोर होणार आहे.  ग्राहक संरक्षण कायद्यात स्पष्ट तरतूद असूनही केवळ जागे अभावी व प्रशासकीय अनिच्छे पोटी फिरत्या खंडपीठाच्या कामकाजात खंड पडला होता. तीन वषार्पूर्वीतर जागे अभावी खंडपीठाला सुनावण्याही घेता आल्या नाहीत. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे खंडपीठ पुण्यात असावे यासाठी राष्ट्रीय आयोगाचे माजी अध्यक्ष डी. के. जैन यांच्याशी पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता. 

देशातील ग्राहकांना सोयीचे व्हावे म्हणून आयोगाचे खंडपीठ देशभर फिरते. पुण्यात दहा वर्षांनी येत असलेल्या या खंडपीठाचे पुण्यातील वकिलांनी स्वागत केले आहे. खंडपीठाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि जागेची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे पदाधिकारी काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर आझम कॅम्पसमधील लॉ कॉलेजमधील म्यूट कोर्टची जागा कामकाज चालविण्यासाठी निश्चित केली.  2008 मध्ये फिरते खंडपीठ पुण्यात आल्यानंतर साधारणत: महिनाभर कामकाज चालविण्यात आले होते. यापूर्वी 2008मध्ये हे खंडपीठ पुण्यात दाखल झाले होते. ग्राहक न्यायालयांकडे दाद मागणा-या ग्राहकांना एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचा दावा किंवा राज्य ग्राहक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध अपील करायचे असेल, तर नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागावी लागते. 

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणेadvocateवकिल