नथुराम गोडसे आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी- ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 22:16 IST2018-03-10T22:16:13+5:302018-03-10T22:16:13+5:30

फाशीवर जाताना 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमी' ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  प्रार्थना गोडसेच्या तोंडी होती, असेही ओवेसी यांनी सांगितले.

Nathuram Godse Was the biggest terrroist in India till now says Asaduddin Owaisi | नथुराम गोडसे आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी- ओवेसी

नथुराम गोडसे आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी- ओवेसी

पुणे: मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुस्लिमांवर टीका करणाऱ्यांना फटकारताना नथुराम गोडसे हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी असल्याचे म्हटले. फाशीवर जाताना 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमी' ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  प्रार्थना गोडसेच्या तोंडी होती, असेही ओवेसी यांनी सांगितले. ओवेसी यांच्या विधानामुळे भाजपाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

पुण्यात आज तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात मुस्लीम समाजाच्या महिलांकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना ओवेसी यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. मी भाषण करायचे म्हटले तर पोलिसांकडून मला नोटीस पाठवली जाते. उद्या याच ठिकाणी उद्धव ठाकरे भाषण करत असतील तर पोलीस दुरूनच त्यांना पाहून निघून जातील. परंतु, मला मात्र नोटीस बजावली जाते. उद्या मोदींना घरी बसावं लागेल, पण पोलीस आणि मी कायम इथेच राहू, असेही ओवेसी यांनी म्हटले. 
सरकार सध्या बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे. त्यासाठी सरकारने 2020 सालचा मुहूर्त निश्चित केला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बँकांना लुटून फरार होणारे उद्योगपती दिसत नाहीत, अशी टीकाही ओवेसी यांनी केली. 




 

Web Title: Nathuram Godse Was the biggest terrroist in India till now says Asaduddin Owaisi