शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा कुख्यात वाहनचोर ‘बुलेटराजा’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 17:57 IST

एक नाही दोन नाही तर तब्बल आठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल..

ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट एकची कारवाई : १७ लाख ७० हजारांच्या १४ दुचाकी जप्त

पिंपरी : उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरटे सुसाट आहेत. यातील नाशिक येथील कुख्यात वाहनचोर असलेल्या ‘बुलेटराजा’ला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. तसेच त्याच्या धुळे येथील एका साथीदारालाही अटक केली. त्यांच्याकडून १७ लाख ७० हजारांच्या १४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

हेमंत राजेंद्र भदाने (वय २४, रा. भोरवाडा, सातपूर, नाशिक) तसेच त्याचा साथीदार योगेश सुनील भामरे (वय २४, रा. गरताड, ता. जि. धुळे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. केटीएम दुचाकी चोरी केलेला चोर भोसरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार युनिट एकच्या पोलिसांची दोन पथके तयार करून सपाळा लावून आरोपी भदाने याला ताब्यात घेतले. त्याने १ सप्टेंबर रोजी धावडेवस्ती, भोसरी येथून केटीएम दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. पिंपरी - चिंचवड व पुणे परीसरातुन बुलेट, एफझेड, केटीएम,पल्सर अशा महागड्या दुचाकी चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद या भागात विक्री केल्या तसेच लपवून ठेवल्या असल्याचे उघड झाले. यातील १० बुलेट, दोन एफझेड, एक केटीएम व एक पल्सर अशा १४ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, एमआयडीसी भोसरी, पुणे येथील भारती विद्यापीठ, सहकारनगर, चतु:श्रृंगी, हडपसर, तर नाशिक येथील सरकारवाडा, अंबड या पोलीस ठाण्यांमधील वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. पिंपरी - चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, नितीन खेसे, गणेश सावंत, विजय मोरे, प्रमोद गर्जे, मारूती जायभाये, विशाल भोईर, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

फेसबुक व मेसेंजरवरून ग्राहकांशी संपर्कआरोपी भदाने हा वाहनचोरी करणारा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे नाशिक जिल्ह्यात ३५ व ठाणे शहर येथे दोन असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊनच्या काळात आरोपी नाशिक येथून पुण्यामध्ये येऊन महागडी दुचाकी चोरी करून ती बीड, धुळे, नाशिक या भागामध्ये घेऊन जाऊन विक्री करायचा. कागदपत्र नंतर देतो, फायनान्सची गाडी आहे, असे कारण तो ग्राहकाला सांगत असे. त्याचा साथीदार योगेश भामरे याच्या मदतीने देखील दुचाकीची विक्री करीत असे. तसेच फेसबुक व मेसेंजरच्या माध्यमातून आरोपी भदाने ग्राहकांशी संपर्क साधायचा. गाडी विक्री झाल्यावर चॅटिंग तसेच मेसेज डिलीट करीत असे.

दोन लाखाची दुचाकी १२ हजारांतआरोपी भदाने याला बुलेटसारख्या महागड्या दुचाकींचे आकर्षण असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच सध्या अशा दुचाकींना मागणी आहे. त्यामुळे आरोपी याने अशा दुचाकींना लक्ष केले. पार्किंग किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा दुचाकी पार्क केलेल्या असल्याचे पाहून आरोपी एका रॉडच्या साह्याने त्यांचे हँडल लॉक तोडून दोन वायरी जोडून दुचाकी घेऊन पसार व्हायचा. तसेच ती दुचाकी विक्री करताना त्याची किंमत ५० ते ६० हजार रुपये सांगून ‘अ‍ॅडव्हान्स’ स्वरुपात १२ ते १५ हजार रुपये घेऊन दुचाकी संबंधित ग्राहकाच्या ताब्यात द्यायचा. त्यानंतर संबंधित ग्राहकाशी कोणताही संपर्क करीत नसे. यातील काही दुचाकी किंमत सरासरी दोन लाखांपर्यंत आहे. 

खरेदीदारांची होणार चौकशीआरोपी भदाने याच्याकडून काही दुचाकी खरेदी करून तसेच काही दुचाकी विक्री करण्यात आरोपी योगेश भामरे याने मदत केली. आणखी काही जणांचा यात समावेश आहे का, याचा शोध सुरू आहे. तसेच अशा दुचाकी खरेदी केलेल्या ग्राहकांकडे देखील विचारणा होणार आहे. इतक्या कमी किमतीत नवी दुचाकी मिळत असतानाही कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित का केली नाही, तसेच दुचाकी चोरीची आहे, असे माहीत असतानाही ती खरेदी केली का, आदी चौकशी अशा ग्राहकांकडून केली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीThiefचोरPoliceपोलिसArrestअटक