शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातली निओ मेट्रो पुण्यातही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नाशिक शहरात महामेट्रोकडून साकारत असलेल्या निओ मेट्रो या प्रकल्पाचा पुण्यातही वापर होण्याची शक्यता आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नाशिक शहरात महामेट्रोकडून साकारत असलेल्या निओ मेट्रो या प्रकल्पाचा पुण्यातही वापर होण्याची शक्यता आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गासाठी हा विचार सुरू आहे. खर्च कमी असल्यामुळे याचा विचार सुरू असून प्रस्ताव आल्यास त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची महामेट्रो कंपनीची तयारी आहे.

महामेट्रोचे व्यवस्थाकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनीच याचे सुतोवाच केले. नाशिकमधील निओ मेट्रोचा प्रकल्प अहवाल महामेट्रोने तयार केला. तो राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. केंद्र सरकारने या अहवालाचा एक पथदर्शी प्रकल्प (मॉडेल) म्हणून विचार केला आणि अन्य काही शहरातही या प्रकारची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत विचार सुरू केला. महामेट्रोसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

पुण्यात निओ मेट्रोचा विचार आहे का या प्रश्नावर डॉ. दीक्षित म्हणाले की असा विचार कोणत्याही शहरात होऊ शकतो. आमचे काम प्रकल्प अहवाल तयार करण्याचे, त्याला केंद्र व राज्य सरकारची संमती मिळाल्यानंतर तो राबवण्याचे आहे. निओ मेट्रोचा खर्च नेहमीच्या मेट्रोपेक्षा अतिशय कमी आहे. प्रत्येक प्रकल्पाच्या मर्यादा असतात. साधारण बस ५५ प्रवाशांना घेऊन धावते. त्यापेक्षा जास्त गर्दी असेल तर बीआरटीची विचार करतात. साधारण २० हजारांच्या आसपास प्रवासी असतील तर मेट्रोचा विचार होतो. यामधील म्हणजे १० ते १५ हजार प्रवासी असतील तर निओ मेट्रोचा विचार केला जातो.

कात्रज-स्वारगेट या मार्गावर निओ होऊ शकते का, या प्रश्नावर डॉ. दीक्षित म्हणाले, “आम्हाला या मार्गाचा अभ्यास करण्यास महापालिकेने सांगितले होते. या मार्गावर उन्नत मार्ग होऊ शकत नाही, असे निदर्शनास आल्याने भुयारी मार्गाच्या प्रकल्प अहवालासाठी महापालिकेने निधी दिला. तो अहवाल तयार करून दिला. आता निओसाठी प्रकल्प अहवाल करायचा तर तशी मागणी त्यांच्याकडून यायला हवी.

निओ योग्य की भुयारी मार्ग यासंदर्भात डॉ. दीक्षित यांनी भाष्य केले नाही. शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी आहे. तोच मार्ग भुयारी म्हणूनच पुढे कात्रजपर्यंत नेण्याची मागणी आहे. या मार्गावरील बीआरटी त्रासदायक असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या नव्या योजनेचा विचार वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याला पक्का दुजोरा मिळू शकला नाही.