शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वह्यांवरही नरेंद्र मोदींची छबी

By admin | Updated: May 25, 2014 04:52 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट दिसून आली. या लाटेत त्यांचा करिश्मा दिसून आला. त्यानंतर आता बाजारपेठेतील विविध वस्तू,

पिंपरी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट दिसून आली. या लाटेत त्यांचा करिश्मा दिसून आला. त्यानंतर आता बाजारपेठेतील विविध वस्तू, इतकेच नाही, तर शालेय वह्यांच्या मुखपृष्ठावर त्यांची छबी झळकली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भाजप व मित्र पक्षांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानाचा उमेदवार जाहीर केले. त्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळे फंडे वापरत मोदी यांना घरोघरी पोहोचविण्यास यश मिळविले. त्याच्या नावांचा आणि छायाचित्राचा वापर करून अनेक वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या. त्यासाठी टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्र आणि सोशल नेटवर्कवर जाहिरातीचा मोठा प्रमाणात वापर केला गेला. लोकसभा निवडणूक काळात भावी पंतप्रधान मोदी यांच्या नावाने चहा, जिलेबी, भाकरी, मिठाई बाजारात दाखल झाली. तसेच त्यांचे छायाचित्र असलेली टोपी, झेंडे, तसेच साड्या यांची बाजारपेठेत धूम होती. भाजपला सर्वाधिक जागा काबीज करण्यास या मोदी करिश्म्याचा लाभ झाला. याच पद्धतीने आता महाविद्यालयाच्या वह्यावर त्याची छबी झळकत आहे. त्यास विद्यार्थी व पालकांची मोठी पसंती मिळत आहे. भावी पंतप्रधानांची छबी असलेल्या वह्या दप्तरात ठेवण्यास ते उत्सुक दिसत आहेत. अशा वहीची दुकानदारांकडे मागणी केली जात आहे. फुलस्केप वहीवर विविध मुद्रेतील मोदी यांचे छायाचित्र लक्षवेधी आहेत. मागील पृष्ठभागावार तिरंगा असून त्यावर ‘वंदे मातरम्’ लिहिले आहे. मुखपृष्ठाच्या आतील बाजूस मोदी यांचा जन्म, आई -वडील, बालपण, शिक्षण, राजकीय प्रवास अशी त्याची संपूर्ण माहिती आहे. मागील पृष्ठभागाच्या आतील बाजूस त्यांना मिळालेल्या विविध राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पुरस्काराची माहिती दिली आहे. चिंचवड स्टेशन येथील दुकानदार सुरेश गादिया यांनी सांगितले, ‘‘मोदी यांची छबी असलेल्या वह्यांना मागणी आहे. मोदी यांचा शपथविधी होईपर्यत या वह्यांवर २० टक्के सूट आहे. (प्रतिनिधी)