शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श पाऊल! अंत्यविधीसाठी गॅसदाहिनी वापरणारी नारायणगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात ठरली पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 16:39 IST

ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यविधीसाठी मोफत गॅस सुविधा उपलब्ध करण्याचा देखील मानस

ठळक मुद्देपुन्हा एकदा सरपंचाकडून माणुसकीचे दर्शन 

नारायणगाव: नारायणगाव येथील वैकुंठधाम येथे अदयावत गॅसदाहिनी बसविण्यात आले असून ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यविधीसाठी मोफत गॅस सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे जिल्हयात गॅसदाहिनी प्रकल्प राबविणारी पहिली ग्रामपंचायत नारायणगाव असणार आहे, अशी माहिती सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी दिली.नारायणगाव येथील ब्राम्हण संघाच्या पुढाकाराने व अनेक संस्थांच्या सहकार्याने नारायणगाव येथील वैकुंठधाम येथे अदयावत गॅसदाहिनी बसविण्यात आली आहे. या गॅसदाहिनीमध्ये दोन जणांचे अंत्यविधी करण्यात आलेले आहेत. याबाबत सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे म्हणाले की, या गॅसदाहिनीमुळे प्रदुषणाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी लागणारे पाच ते सहा मण सरपण देखील वाचेल व पर्यायाने होणारा ४ ते ५ हजार रूपये खर्चही वाचणार आहे. पावसाळयात लाकडे ओले असल्यामुळे अंत्यविधीसाठी होणारा त्रासही या अत्याधुनिक गॅसदाहिनीमुळे वाचणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यविधीसाठी मोफत गॅस सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असून लवकरच त्याबाबत निर्णय ग्रामसभेत घेण्यात येणार आहे. गॅसदाहिनीद्वारे अंत्यविधीसाठी एक तास कालावधी लागणार आहे, अशी माहिती सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

............................

पुन्हा एकदा सरपंचाकडून माणुसकीचे दर्शन 

कोरोनाबाधित मृत लोकांचे अंत्यविधी करून माणुसकीचे दर्शन घडविणारे नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी पुन्हा एकदा आदर्श घालून दिला आहे. शनिवारी (दि १५) अंत्यविधी सुरू असताना गॅसदाहिनीमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे अर्धवट विधी झालेला मृतदेह असल्याने लाकडाच्या सहाय्याने उर्वरीत विधी करण्याचे ठरले. याची माहिती सरपंच पाटे यांना समजताच ते तिथे आले आणि तात्काळ मृतांच्या नातेवाईकांना धीर देत उर्वरीत विधी गॅसदाहिनीमध्येच करणार अशी भूमिका स्पष्ट केली. स्फोटामुळे गॅसद्वारे विधी न करता थेट गॅसदाहिनीला नुकसान होण्याचा धोका असताना देखील लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी पूर्ण केला.याबद्दल नातेवाईकांनी सरपंच योगेश पाटे यांचे आभार व्यक्त केले. 

टॅग्स :narayangaonनारायणगावgram panchayatग्राम पंचायतDeathमृत्यूsarpanchसरपंच