कसब्यासाठी महाविकास आघाडीकडून 'या' तीन उमेदवारांची नावे; चिंचवडलाही जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 07:25 PM2023-02-02T19:25:09+5:302023-02-02T19:25:16+5:30

कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून उदयाच्या बैठकीत यावर निर्णय होणार

Names of these three candidates from Mahavikas Aghadi for Kasba Chinchwad is also heavily prepared | कसब्यासाठी महाविकास आघाडीकडून 'या' तीन उमेदवारांची नावे; चिंचवडलाही जोरदार तयारी

कसब्यासाठी महाविकास आघाडीकडून 'या' तीन उमेदवारांची नावे; चिंचवडलाही जोरदार तयारी

googlenewsNext

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिचंवड मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. दोन्ही मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून महाविकास आघाडीच्या उदयाच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.

प्रदेश काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आमदार . प्रणिती शिंदे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आमदार संग्राम थोपटे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, पुण्याचे कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते.

या दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज भरण्याची शेवटची तारिख ७ फेब्रुवारी आहे. कसबा व चिंचवड या दोन्ही जागांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे तीन इच्छुक उमेदवार आहेत. ही नावे हायकमांडकडे पाठवली जातील व त्याचा निर्णय घेतला जाईल. या दोन्ही जागांसाठी आमची आघाडी असल्याने एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल असे नाना पटोले यांनी सांगितले.

मविआची शुकवारी बैठक

कसबा आणि चिचंवड विधानसभा या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. महाविकास आघाडीची शुकवारी बैठक होणार आहे.

तीन नावे पक्षश्रेष्ठीकडे पाठविणार

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तीन इच्छुक उमेदवार आहेत. रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे या तिघांची नावे पक्षश्रेष्ठीकडे पाठविणार आहे. त्यानंतर उमेदवारी जाहीर होणार आहे.

Web Title: Names of these three candidates from Mahavikas Aghadi for Kasba Chinchwad is also heavily prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.