शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोत्यातील मृतदेहाचे गुढ उलगडले, अनैतिक संबंधातून झाला तरुणाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 22:11 IST

बंगलुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ खुन करुन पोत्यात बांधून टाकून दिलेल्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना गुढ उकलण्यात यश आले आहे़

पुणे - मुंबई -बंगलुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ खुन करुन पोत्यात बांधून टाकून दिलेल्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना गुढ उकलण्यात यश आले आहे़  अमर क्षीरसागर (वय २२, रा़ कात्रज) असे खुन केलेल्या तरुणाचे नाव आहे़ अनैतिक संबंधातून हा खुन झाल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले असून पोलिसांनी रोहिदास पाटोळे (वय ४५, रा़ कात्रज) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर हा पालिकेत कंत्राटी पद्धतीने कामावर होता़ अमरचे आईवडिल सोलापूरला असतात़ आरोपी रोहिदास हाही पालिकेत कामाला आहे़ त्या दोघांचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते़ त्यावरुन दोघांमध्ये यापूर्वीही वार झाले होते़ या कारणावरुन रोहिदास याने अमर याचा खुन करुन हातपाय बांधून त्याचा मृतदेह पोत्यात घातला व नवले पुलाखाली टाकून दिला होता़ खुन झालेल्या तरुणाच्या ओळख पटली नव्हती़ त्याचदरम्यान, अमरचे कुटुंबीय हरविल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असताना त्यांनी दिलेली माहिती आणि मृतदेहाची माहिती जुळल्याने त्याची ओळख पटली़ त्यांच्याबाबत माहिती समजल्यावर संबंधित महिलेकडे केलेल्या चौकशीतून पोलीस आरोपीपर्यंत पोहचले़ रोहिदास याला पोलिसांनी अटक करुन रविवारी न्यायालयात हजर केले होते़ अधिक तपासासाठी न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ या प्रकरणात रोहिदास याला कोणी मदत केली़ त्याने कोठे खुन करुन नंतर तो मृतदेह नवले पुलाजवळ टाकला, याची माहिती घेण्याचे काम भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत़  ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील व त्यांचे सहकारी प्रदीप शिंदे, शिवा गायकवाड, सुतार, कुंभार, मोकाशी यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे