The mystery of the grandson's body was revealed, the murder of a young man was caused by an immoral relationship | पोत्यातील मृतदेहाचे गुढ उलगडले, अनैतिक संबंधातून झाला तरुणाचा खून 

पोत्यातील मृतदेहाचे गुढ उलगडले, अनैतिक संबंधातून झाला तरुणाचा खून 

पुणे - मुंबई -बंगलुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ खुन करुन पोत्यात बांधून टाकून दिलेल्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना गुढ उकलण्यात यश आले आहे़  अमर क्षीरसागर (वय २२, रा़ कात्रज) असे खुन केलेल्या तरुणाचे नाव आहे़ अनैतिक संबंधातून हा खुन झाल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले असून पोलिसांनी रोहिदास पाटोळे (वय ४५, रा़ कात्रज) याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर हा पालिकेत कंत्राटी पद्धतीने कामावर होता़ अमरचे आईवडिल सोलापूरला असतात़ आरोपी रोहिदास हाही पालिकेत कामाला आहे़ त्या दोघांचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते़ त्यावरुन दोघांमध्ये यापूर्वीही वार झाले होते़ या कारणावरुन रोहिदास याने अमर याचा खुन करुन हातपाय बांधून त्याचा मृतदेह पोत्यात घातला व नवले पुलाखाली टाकून दिला होता़ 

खुन झालेल्या तरुणाच्या ओळख पटली नव्हती़ त्याचदरम्यान, अमरचे कुटुंबीय हरविल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असताना त्यांनी दिलेली माहिती आणि मृतदेहाची माहिती जुळल्याने त्याची ओळख पटली़ त्यांच्याबाबत माहिती समजल्यावर संबंधित महिलेकडे केलेल्या चौकशीतून पोलीस आरोपीपर्यंत पोहचले़ रोहिदास याला पोलिसांनी अटक करुन रविवारी न्यायालयात हजर केले होते़ अधिक तपासासाठी न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ 

या प्रकरणात रोहिदास याला कोणी मदत केली़ त्याने कोठे खुन करुन नंतर तो मृतदेह नवले पुलाजवळ टाकला, याची माहिती घेण्याचे काम भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत़  ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील व त्यांचे सहकारी प्रदीप शिंदे, शिवा गायकवाड, सुतार, कुंभार, मोकाशी यांनी केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The mystery of the grandson's body was revealed, the murder of a young man was caused by an immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.