शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

"माझे पोलीस पप्पा कर्तव्यावर आहेत, तुम्ही घरातच थांबा"...पाच वर्षीय चिमुरड्याची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 5:34 PM

माझ्या पोलीस पप्पांना कोरोना व्हायरमुळे घराबाहेर जाऊ नका सांगतो. पण ते माझ ऐकत नाहीत...

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ट्विटरवर हँडलवरून विविध संदेशांतून नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन

पिंपरी : माझे पोलीस पप्पा कर्तव्यावर आहेत. तुम्ही घरातच थांबा, असे आवाहन एका पाच वर्षीय चिमुरड्याने केले आहे. त्याचा फोटो ट्विट करून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घराबाहेर न पडण्योच शहरवासीयांना आवाहन केले आहे.कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी वाहनांना बंदी, संचारबंदी, जमावबंदी असे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यासोबतच जनजागृती देखील केली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ट्विटरवर हँडलवरून विविध संदेशांतून नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. 

  मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेल्या खुशाल वाळुंजकर यांचा मुलगा पृथ्वीराज याने एका सूचना फलकावर याबाबत आवाहन केले आहे. माझे पोलीस पप्पा व इतर शासकीय कर्मचारी, डॉक्टर आपल्या सेवेसाठी कर्तव्यावर आहेत. कृपया तुम्ही घरात रहा. मी माझ्या पोलीस पप्पांना कोरोना व्हायरमुळे घराबाहेर जाऊ नका सांगतो. पण ते माझ ऐकत नाहीत. पण तुम्ही तरी तुमच्या मुलांसाठी घरामध्ये थांबा, मनापासून विनंती, असा आवाहनात्मक संदेश फलकावर आहे.    पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पृथ्वीराज याचा फलकासह फोटो ट्विटरवरून व्हायरल केला आहे. त्यामुळे तो चचेर्चा विषय ठरत आहे. पृथ्वीराज याच्या भावनिक आवाहनाला नागरिकांच्या प्रतिसादाची गरज असल्याचे नेटकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस