शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Swapnil Kusale: भविष्यात ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याचे माझे ध्येय; स्वप्नील कुसाळेचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 17:54 IST

ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले कांस्यपदक हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या देशातील प्रत्येकाचे आहे

पुणे: पॅरिसमध्ये जिंकलेले कांस्यपदक हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या देशातील प्रत्येकाचे आहे. भविष्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे आणि त्यासाठी मी लवकरच तयारी सुरू करणार आहे. सुवर्ण जिंकेपर्यंत माझी नेमाबीज सुरूच राहिल असा निर्धार ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने पुण्यात व्यक्त केला.

खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक (Paris Olympics 2024) जिंकून देणारा नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे गुरुवारी पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. बालेवाडी येथे आयोजित सत्कार समारंभानंतर तो बोलत होता. पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला असून पुणे विमानतळावर स्वप्नीलचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर स्वप्नीलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली. यावेळी  ट्रस्ट कडून स्वप्नील चे स्वागत करण्यात आले. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम मध्ये त्याने नेमबाजीचा सराव केला होता. म्हणूनच स्टेडियमला भेट देण्यासाठी तो आज दुपारी बालेवाडीला आला. याठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि भारत माता कि जय या जयघोषात त्याची ऑर्किड हॉटेल ते शुटींग रेज जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसेच या उत्तुंग कामगिरीला सलाम करण्यासाठी एका विशेष सत्कार करण्यात आला.  

पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कास्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पहिल्यांदाच पदक जिंकले आहे. या पदकावर नाव कोरुन स्वप्नीलने मोठा इतिहास रचला आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

टॅग्स :Puneपुणेparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४swapnil kusaleस्वप्नील कुसाळेHealthआरोग्यkolhapurकोल्हापूरSocialसामाजिकBalewadiबालेवाडी