शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

पुणेकरांसाठी ‘माझा अर्थसंकल्प’; नागरिकांना मिळणार सूचना, योजना सादर करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 4:29 PM

शहराच्या विकासच्या नियोजनामध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी ‘माझा अर्थसंकल्प’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देशहराच्या विकासासाठी त्यांची मते, सूचना, कल्पना तसेच काही योजना सूचविण्याचे आवाहनमिळालेल्या व्यवहार्य आणि योग्य प्रतिसादाचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात केला जाईल समावेश

पुणे : शहराच्या विकासच्या नियोजनामध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी ‘माझा अर्थसंकल्प’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना शहरासंदर्भातील त्यांच्या सूचना, कल्पना आणि काही योजना सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांकडे शहराच्या विकासासाठी काही कल्पक, नाविन्यपूर्ण योजना, सूचना असतात.  शहराचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक अधिकधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील नागरिकांवर किमान भार देऊन  उत्पन्नाचे अधिकाधिक मार्ग शोधणाऱ्या मतांचे, योजनांचे स्वागत केले जाईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पुणे शहराच्या विकासासाठी त्यांची मते, सूचना, कल्पना तसेच काही योजना सूचविण्याचे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. नागरिकांकडून मिळालेल्या व्यवहार्य आणि योग्य प्रतिसादाचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समावेश केला जाईल. पुणे महानगरपलिकेच्या www.pmc.gov.in  या संकेतस्थळला भेट देऊन ५ फेब्रुवारीपासून १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत या उपक्रमात केवळ आॅनलाईन अर्ज भरून सहभागी होता येईल, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका