शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कोरोनाच्या दहशतीत पण मुस्लिम युवकाने 'माणुसकी'चा धर्म जपला; बेवारस प्रेताला अखेरचा 'मार्ग' दाखविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 15:37 IST

बेवारस प्रेत नेण्यास सरकारी रुग्णवाहिकेचा नकार ; मृतदेह तीन तास फुटपाथवरच पडून;

ठळक मुद्देखासगी रुग्णवाहिकेच्या मुस्लिम चालकाने घडविले माणुसकीच्या धर्माचे दर्शन..

कल्याणराव आवताडे- धायरी: माणसाने माणूस जोडत राहावा हीच माणुसकीची शिकवण सर्व धर्मांनी, साधू संतांनी, महात्म्यांनी जगाला दिली. तीच शिकवण जपण्यासाठी कोरोना संसर्गजन्य विषाणू मृत्यूतांडव घडवत असताना देखील काहीजण जीवाची बाजी लावत दिवसरात्र निधड्या छातीने त्याचा सामना करत आहे. एकीकडे ही प्रेरणादायी अवस्था असताना मात्र, दुसरीकडे माणसाला माणूस म्हणून विचारत नाही अशी पण एका दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बेवारस वयोवृद्धाचा मृतदेह नेण्यास सरकारी रुग्णवाहिकेने नकार दिला. खरंतर मरणानंतरही यातनांनी त्या जीवाची पाठ सोडली नाही असेच म्हणावे लागेल. मात्र, याचवेळी खासगी रुग्णवाहिकेच्या मुस्लिम चालकाने ही जबाबदारी खांद्यावर घेत माणुसकी हाच धर्म जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे अधोरेखित केले. बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील फुटपाथवर एक बेवारस व्यक्ती निपचित पडून असल्याचा फोन कंट्रोल रूमला आला. सेनापती बापट रस्ता हा चतुश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याने कर्तव्यावर हजर असणारे पोलीस नाईक अमोल भिसे व पोलीस शिपाई अमोल गावकरे यांनी तातडीने घटनेच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता एक वयोवृद्ध फुटपाथवर निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने १०८ नंबरला फोन करून सरकारी रुग्णवाहिका मागविली. त्यानंतर सरकारी रुग्णवाहिकेत डॉ. अश्विनी देशपांडे त्या ठिकाणी आल्या. डॉ. देशपांडे यांनी त्या बेवारस वृद्धास तपासले असता तो मयत झाल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी त्या मयत वृद्धास पोस्टमार्टमसाठी ससून हॉस्पिटलला सोडण्याची विनंती केली असता समजा तो वयोवृद्ध कोरोनाबाधित असेल तर तसेच आमच्याकडे पीपीई किट नसल्याने तुम्ही खासगी रुग्णवाहिका बोलवा, असे सांगत थेट त्या मयत वृद्धास घेऊन जाण्यास नकार दिला. पोलिसांनी सरकारी रुग्णवाहिकेच्या संबंधित आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी डॉ. वेद्ण्यास मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही आम्ही बेवारस बॉडी नेऊ शकत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी बऱ्याच खासगी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती, त्यावेळी त्यांनी पाषाण येथील खासगी रुग्णवाहिका चालक गब्बर शेख यांना संपर्क केला असता त्यांनी तात्काळ येऊन त्या मृत बेवारस प्रेतास ससून रुग्णालयात नेले. दरम्यान त्या बेवारस वयोवृध्दाचा मृतदेह तब्बल तीन तास फुटपाथवर पडून होता.  

खासगी रुग्णवाहिकेच्या मुस्लिम चालकाने घडविले माणुसकीच्या धर्माचे दर्शन..धर्म, रुढी, प्रथा-परंपरा या विषयांवरून सोशल मीडियात बराच खल सुरू आहे. त्यात जो-तो आपल्या धमार्ची श्रेष्ठता पटवून देतोय. परंतु बुधवारी खासगी रुग्णवाहिकेचा चालक गब्बार महम्मद शेख यांनी माणुसकीच्या धर्माचे दर्शन घडवलं. पाषाण येथील जय भवानी ट्रस्टच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून गेल्या १५ वर्षांपासून रुग्णांची सेवा करणाऱ्या गफूर भाईने त्या वयोवृद्ध बेवारस प्रेतास कोणतेही सुरक्षेतेची साधने नसताना उचलून रुग्णवाहिकेत पोस्टमार्टमसाठी घेऊन गेले. एवढ्यावरच न थांबता ते पहाटे चार वाजेपर्यंत ससूनमध्ये थांबले. त्या बेवारस वृद्धाचा रिपोर्ट 'निगेटिव्ह' आल्यानंतरच ते घरी गेले. पोलीस नाईक अमोल भिसे व पोलीस कर्मचारी अमोल गावकरे हे बुधवारी सकाळी ९ वाजता कर्तव्यावर आले होते. गुरुवारी पहाटे चार वाजता त्या बेवारस वृद्धाचा पोस्टमार्टम झाल्यांनतर ते घरी गेले. उपासमारी व अशक्तपणामुळे त्या वृद्धाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवाल आल्याचे पोलीस नाईक भिसे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीPoliceपोलिसdoctorडॉक्टरDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस