गाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 21:02 IST2019-09-17T21:01:07+5:302019-09-17T21:02:56+5:30

गाडी न दिल्याच्या कारणावरून चार जणांनी एकावर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. १५) रात्री साईनाथनगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

A murderous attack on one who was not giving byke | गाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला

गाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला

पिंपरी : गाडी न दिल्याच्या कारणावरून चार जणांनी एकावर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. १५) रात्री साईनाथनगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

         या प्रकरणी सचिन प्रकाश रुपटक्के (वय ३६, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अक्षय ऊर्फ आकाश अनिल जाधव (वय २३), स्वप्नील अनिल जाधव (वय २५), अनिल गोविंद जाधव (वय ४८, सर्व रा. साईनाथनगर थेरगाव), मयूर अशोक पवळे (वय २१, रा. पवार कॉलनी, थेरगाव) यांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी सचिन साईनाथनगर येथील स्वामी समर्थ लॉण्ड्रीसमोर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी अक्षय याने त्याच्या एका मित्राला सचिन यांच्याकडे गाडी मागण्यासाठी पाठवले. सचिन यांनी त्यांची गाडी देण्यास नकार दिला. या कारणावरून आरोपी अक्षय याने सचिन यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अन्य आरोपींनी सचिन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Web Title: A murderous attack on one who was not giving byke