शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

बारामती: वडीलांशी मैत्रीचे संबंध असल्याच्या रागातून बहिण-भावाने केला महिलेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 20:30 IST

आम्ही तिच्या नातेवाईकांना तुमच्या हॉस्पिटलला घेवून येतो, तुम्ही तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाल्याचे सांगा...

बारामती: शहरातील कसबा या मध्यवर्ती ठिकाणी बहिण भावाने एका महिलेला वडीलांशी मैत्रीचे संबंध असल्याच्या रागातून काठीने बेदम मारहाण करत तिचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बहिण-भावाविरोधात फॅमिली डॉक्टरने शहर पोलीसांत फिर्याद दिली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुनील रामदास पवार (रा. पवारवस्ती, शारदानगर, माळेगाव खुर्द) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश प्रमोद फरतडे व अनुजा प्रमोद फरतडे (रा. कसबा, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या बहिण भावांची  नावे आहेत.

डॉ. पवार यांचे बारामतीत हॉस्पिटल आहे. संशयितांचे वडील प्रमोद उर्फ दादा नामदेव फरतडे हे गेल्या तीन वर्षांपासून डॉ. पवार यांच्याकडे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांचे या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहेत. १० नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता फिर्यादी डॉ. पवार  घरी होते. यावेळी संशयित अनुजा हिने फोन करत वडीलांना एका महिलेसोबत जुन्या वाड्यात पकडले असून त्या दोघांना मी व भाऊ ऋषिकेश यांनी काठीने मारले असल्याचे सांगितले. त्यावर फियादी डॉ. पवार यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ११ रोजी सकाळी १०.३०  वाजता अनुजा हिने फिर्यार्दीला फोन केला. तसेच संबंधित महिलेचा श्वास चालत नाही, तिला ऋषिकेश याने बारामतीतील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले आहे, तेथे डॉक्टरांनी ती महिला मयत झाल्याचे सांगितले. आम्ही तिच्या नातेवाईकांना तुमच्या हॉस्पिटलला घेवून येतो, तुम्ही तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाल्याचे सांगा, अशी विनंती केली. डॉ. पवार यांनी असे सांगण्यास  नकार दिला. दुपारी १२.३० च्या सुमारास आरोपी ऋषिकेश व मयत महिलेचा मुलगा व मुलगी त्या महिलेचे प्रेत परत डॉक्टर पवार यांच्याकडे घेऊन गेले. तेथे पवार यांनी तिचा चेहरा पाहिल्यावर ती चार ते पाच तासांपूर्वीच मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. परंतु सदर मृत्यू कशाने झाला आहे, हे माहिती करून घेण्यासाठी त्या प्रेताचे शवविच्छेदन करण्यास डॉ. पवार यांनी सांगितले.

महिलेच्या  प्रेतावर कुठल्याही प्रकारच्या बाह्य जखमा नव्हत्या. केवळ नाकातून किरकोळ रक्त आले होते. मृत महिला घसरून पडून अटॅक आल्याचे आरोपींनी  सांगितले. प्रमोद फडतरे यांनाही मारहाण झालेली होती. परंतु आरोपी मुले असल्याने त्यांनी देखील काही वस्तुनिष्ठ माहिती त्यांना दिली नाही. त्यामुळे त्यांचाही महिलेचा मृत्यू हा अटॅकने झाला असेल त्यांना घातपाताची काही शंका आली नाही. नंतर मयताच्या नातेवाईकांनी सोपस्करपणे सर्वांच्या उपस्थितीत महिलेवर अंत्यसंस्कार केले.

दरम्यान या घटनेत संशयितांच्या वडीलांनाही मार लागला होता. त्यांच्यावर डॉ. पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दि. १९ पर्यंत ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यावेळी त्यांनीही मुलगा व मुलीने मारहाण केल्याचे सांगितले. दि. २२ रोजी डॉ. पवार यांना महिलेच्या मृत्यूसंबंधी शहर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी अधिक चौकशी केली. यावेळी  बहिण-भावाने मारहाण केल्याची कबुली दिली. तसेच मृत महिलेचा मोबाईल व वडीलांचे रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.मंगळवारी(दि २३) न्यायालयाने दोघा आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक अधिक तपास करीत आहेत. ...त्या नंतर ते फडतरे वाड्यावर आले११ नोव्हेंबर रोजी प्रमोद फडतरे यांचा वाढदिवस होता. वाढदिवस घरी बायका मुलांच्या मध्ये साजरा केल्यानंतर ते फडतरे वाड्यावर आले. त्यानंतर त्यांनी मयत महिलेला बोलून घेतले. काही वेळानंतर ते दोघे फडतरे वाड्यावर असल्याची माहिती कुणीतरी दोघा आरोपींना दिली. त्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी रागाच्या भरामध्ये मयत महिला व प्रमोद फडतरे या दोघांना काठीने मारहाण केली. मारहाणी नंतर संबंधित महिला निपचित पडली. प्रमोद फडतरे जखमी झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले....घटनेची कुजबुज आठवडाभर होतीकसबा परिसरामध्ये ११ नोव्हेंबर  रोजी रात्री एका महिलेचा मृत्यू ‘हार्ट अटॅक’ने झाला आहे. मात्र, हा घातपात आहे. दवाखान्यातून मृत महिलेला परस्पर नेत तिचे अंत्यसंस्कार केल्याच्या घटनेची कुजबुज आठवडाभर बारामतीत सुरु होती. शहर पोलिसांनी त्यांची गोपनीय यंत्रणा कामाला लावली. अखेर पोलिसांनी चौकशीअंती तब्बल १२ दिवसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी