बारामती: वडीलांशी मैत्रीचे संबंध असल्याच्या रागातून बहिण-भावाने केला महिलेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:25 PM2021-11-23T20:25:47+5:302021-11-23T20:30:54+5:30

आम्ही तिच्या नातेवाईकांना तुमच्या हॉस्पिटलला घेवून येतो, तुम्ही तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाल्याचे सांगा...

murder of woman anger over her friendship with father baramati | बारामती: वडीलांशी मैत्रीचे संबंध असल्याच्या रागातून बहिण-भावाने केला महिलेचा खून

बारामती: वडीलांशी मैत्रीचे संबंध असल्याच्या रागातून बहिण-भावाने केला महिलेचा खून

googlenewsNext

बारामती: शहरातील कसबा या मध्यवर्ती ठिकाणी बहिण भावाने एका महिलेला वडीलांशी मैत्रीचे संबंध असल्याच्या रागातून काठीने बेदम मारहाण करत तिचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बहिण-भावाविरोधात फॅमिली डॉक्टरने शहर पोलीसांत फिर्याद दिली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुनील रामदास पवार (रा. पवारवस्ती, शारदानगर, माळेगाव खुर्द) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश प्रमोद फरतडे व अनुजा प्रमोद फरतडे (रा. कसबा, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या बहिण भावांची  नावे आहेत.

डॉ. पवार यांचे बारामतीत हॉस्पिटल आहे. संशयितांचे वडील प्रमोद उर्फ दादा नामदेव फरतडे हे गेल्या तीन वर्षांपासून डॉ. पवार यांच्याकडे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांचे या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहेत. १० नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता फिर्यादी डॉ. पवार  घरी होते. यावेळी संशयित अनुजा हिने फोन करत वडीलांना एका महिलेसोबत जुन्या वाड्यात पकडले असून त्या दोघांना मी व भाऊ ऋषिकेश यांनी काठीने मारले असल्याचे सांगितले. त्यावर फियादी डॉ. पवार यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ११ रोजी सकाळी १०.३०  वाजता अनुजा हिने फिर्यार्दीला फोन केला. तसेच संबंधित महिलेचा श्वास चालत नाही, तिला ऋषिकेश याने बारामतीतील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले आहे, तेथे डॉक्टरांनी ती महिला मयत झाल्याचे सांगितले. आम्ही तिच्या नातेवाईकांना तुमच्या हॉस्पिटलला घेवून येतो, तुम्ही तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाल्याचे सांगा, अशी विनंती केली. डॉ. पवार यांनी असे सांगण्यास  नकार दिला. दुपारी १२.३० च्या सुमारास आरोपी ऋषिकेश व मयत महिलेचा मुलगा व मुलगी त्या महिलेचे प्रेत परत डॉक्टर पवार यांच्याकडे घेऊन गेले. तेथे पवार यांनी तिचा चेहरा पाहिल्यावर ती चार ते पाच तासांपूर्वीच मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. परंतु सदर मृत्यू कशाने झाला आहे, हे माहिती करून घेण्यासाठी त्या प्रेताचे शवविच्छेदन करण्यास डॉ. पवार यांनी सांगितले.

महिलेच्या  प्रेतावर कुठल्याही प्रकारच्या बाह्य जखमा नव्हत्या. केवळ नाकातून किरकोळ रक्त आले होते. मृत महिला घसरून पडून अटॅक आल्याचे आरोपींनी  सांगितले. प्रमोद फडतरे यांनाही मारहाण झालेली होती. परंतु आरोपी मुले असल्याने त्यांनी देखील काही वस्तुनिष्ठ माहिती त्यांना दिली नाही. त्यामुळे त्यांचाही महिलेचा मृत्यू हा अटॅकने झाला असेल त्यांना घातपाताची काही शंका आली नाही. नंतर मयताच्या नातेवाईकांनी सोपस्करपणे सर्वांच्या उपस्थितीत महिलेवर अंत्यसंस्कार केले.

दरम्यान या घटनेत संशयितांच्या वडीलांनाही मार लागला होता. त्यांच्यावर डॉ. पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दि. १९ पर्यंत ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यावेळी त्यांनीही मुलगा व मुलीने मारहाण केल्याचे सांगितले. दि. २२ रोजी डॉ. पवार यांना महिलेच्या मृत्यूसंबंधी शहर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी अधिक चौकशी केली. यावेळी  बहिण-भावाने मारहाण केल्याची कबुली दिली. तसेच मृत महिलेचा मोबाईल व वडीलांचे रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.मंगळवारी(दि २३) न्यायालयाने दोघा आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक अधिक तपास करीत आहेत.
 
...त्या नंतर ते फडतरे वाड्यावर आले
११ नोव्हेंबर रोजी प्रमोद फडतरे यांचा वाढदिवस होता. वाढदिवस घरी बायका मुलांच्या मध्ये साजरा केल्यानंतर ते फडतरे वाड्यावर आले. त्यानंतर त्यांनी मयत महिलेला बोलून घेतले. काही वेळानंतर ते दोघे फडतरे वाड्यावर असल्याची माहिती कुणीतरी दोघा आरोपींना दिली. त्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी रागाच्या भरामध्ये मयत महिला व प्रमोद फडतरे या दोघांना काठीने मारहाण केली. मारहाणी नंतर संबंधित महिला निपचित पडली. प्रमोद फडतरे जखमी झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

...घटनेची कुजबुज आठवडाभर होती
कसबा परिसरामध्ये ११ नोव्हेंबर  रोजी रात्री एका महिलेचा मृत्यू ‘हार्ट अटॅक’ने झाला आहे. मात्र, हा घातपात आहे. दवाखान्यातून मृत महिलेला परस्पर नेत तिचे अंत्यसंस्कार केल्याच्या घटनेची कुजबुज आठवडाभर बारामतीत सुरु होती. शहर पोलिसांनी त्यांची गोपनीय यंत्रणा कामाला लावली. अखेर पोलिसांनी चौकशीअंती तब्बल १२ दिवसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Web Title: murder of woman anger over her friendship with father baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.