शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
2
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
3
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
4
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
5
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
6
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
7
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
8
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
9
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
10
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
11
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
12
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
13
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
14
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
15
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
16
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
17
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
18
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
19
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
20
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath

विश्रांतवाडीत ज्येष्ठ नागरिक महिलेचा खून, चोरीच्या उद्देशाने खुनाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:30 AM

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे चार ते रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा चिरून खूनअंगावरील दागिने काढून प्रयत्न करीत असताना त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वारसोसायटी तसेच आसपासच्या भागातील सीसाटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू

पुणे : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे चार ते रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली. मध्यरात्री एकच्या सुमारास उघडतीस आलेल्या या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. राधा माधवन नायर (वय ७१, रा. बिल्डिंग क्रमांक १०, अंबानगरी सहकारी सोसायटी, धानोरी रस्ता, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा नातू मेहुल संजय निजवान (वय २१, रा. गुरूद्वारा पारशी जिमखान्या समोर, लष्कर, पुणे) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा या शनिवारी दिवसभर घरामध्ये एकट्या होत्या. दुपारी पावणे चार ते रात्री साडे दहाच्या दरम्यान त्यांच्या घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांच्याशी झटापट केली. अंगावरील दागिने काढून प्रयत्न करीत असताना त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. त्यांचा गळा चिरून खून केल्यानंतर राधा यांच्या हातातील बांगड्या, गळ्यातील सोनसाखळी काढून पळ काढला. ही घटना रात्री उशिरा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटी तसेच आसपासच्या भागातील सीसाटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोरPuneपुणे