दौंडला आझादहिंद एक्सप्रेसवर दगडफेक करुन मायलेकींवर तीक्ष्ण हत्याराने वार

By admin | Published: March 1, 2016 01:22 PM2016-03-01T13:22:25+5:302016-03-01T19:06:00+5:30

दौंड रेल्वे स्थानकाजवळ चोरट्यांनी हावडा-पुणे एक्स्प्रेसमध्ये घुसून माय-लेकींवर धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्यांना लुटल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली.

Daulat was beaten with a sharp weapon on Mayaleki by throwing stones at Azadhind Express | दौंडला आझादहिंद एक्सप्रेसवर दगडफेक करुन मायलेकींवर तीक्ष्ण हत्याराने वार

दौंडला आझादहिंद एक्सप्रेसवर दगडफेक करुन मायलेकींवर तीक्ष्ण हत्याराने वार

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
दौंड, दि. १ : दौंड रेल्वे स्थानक परिसरात आझाद हिंद एक्सप्रेसमधील एस 5 या बोगीतून प्रवास करणा-या दोन महिला प्रवाशांची चोरटयांनी लूटमार करुन त्यांच्या हातावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यावेळी चोरटयांनी रेल्वे गाडीवर तुफानी दगडफेक केल्याने प्रवाशी भयभयीत झाले होते. 
 
या घटनेत दोन्ही महिला प्रवाशांच्या हातावर वार झाल्याने त्या गंभीररित्या जखमी आहेत. त्यांच्यावर येथील पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 
 
संपा सिन्हा (वय 54 ), सामिया सिन्हा (वय 25, दोघीही राहणार मालवियानगर, चिरीमीरी, जि. कोरिया, छत्तीसगड) असे जखमी झालेल्या प्रवाशांची नावे असून रेल्वे पोलीसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.  
 
आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास आझादहिंद एक्सप्रेस दौंड स्थानकात येण्यापूर्वी नेहमीप्रमाणो सिल्पर कंपनीजवळील सिग्नलवर थांबविण्यात आली होती. या बोरीत एका बाजूला असलेल्या दोन खिडक्यांजवळ या मायलेकी झोपलेल्या होत्या. तर खिडक्यांच्या काचा उघडय़ा होत्या. या खिडकीतून अज्ञात व्यक्ती गळ्य़ात अडकाविण्याची पर्स ओढत असल्याचे लक्षात येताच या मायलेकीनी त्यांना प्रतिकार करत पर्स हाताने दाबून धरली. 
 
तेव्हा चोरटय़ांनी तीक्ष्ण हत्याने दोघी मायलेकींच्या हातांवर वार केले आणि पर्स घेऊन पोबारा केला. यावेळी चोरटय़ांनी रेल्वेवर तुफानी दगडफेक केली. बराच वेळ गाडी या परिसरात थांबून होती. मात्र पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी वेळेवर आले नाहीत. मात्र या दोन्ही मायलेकी मदतीची याचना करीत होती. 
 
काही वेळानी गाडी रेल्वे स्थानकात आली. तेव्हा या मायलेकी जोरजोरात ओरडत होत्या. कारण त्यांच्या हातावर गंभीर वार केलेले होते.  यावेळी नियमित पुण्याला प्रवास करणारे प्रतिक साळुंके, आनंद ओव्हाळ, विश्वजीत पाचपुते या तिघांना ओरडण्याचा आवाज आला असता त्यांनी पुढील प्रवास रद्द करुन या मायलेकींना रेल्वे स्थानकात उतरविले. त्यानंतर रेल्वे पोलीस, रेल्वे प्रशासन घटनास्थळी आले. 
 
रेल्वेचे डॉ. सजीव यांनी रेल्वे स्थानकात प्राथमिक उपचार केल्यानंतर रेल्वे पोलीसांनी या दोघी महिलांना पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 
 
त्यानंतर रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम पवरे आणि पोलीसांनी घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केली. श्वानपथकाने दाखविलेल्या दिशेनुसार घटनास्थळापासून काही अंतरावर पर्समधील एटीएम कार्ड मिळाले. पुढे पुढे गेल्यावर पर्स मिळाली. 
 
चौकट 
पर्स ताब्यात घेण्यासाठी केले वार
चोरटय़ांनी या मायलेकींची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या पर्स सोडत नव्हत्या यावरुन पर्समध्ये काहीतरी मौलवान वस्तू आणि पैसे असावेत असा अंदाज चोरटय़ांचा झाला. त्यानुसार त्यांनी पर्स ताब्यात घेण्यासाठी दोन्ही महिलांच्या हातावर वार करुन पर्स लंपास केली. पर्समध्ये मोबाईल, महत्वाची कार्ड आणि 350 रुपये होते. 
 
आणि घटनेला वाचा फुटली 
दोन्ही महिलांच्या हातावर वार झाल्यानंतर संपा सिन्हा या बेशुद्ध पडल्या. तर त्यांची मुलगी सामिया मदतीची याचना करीत होती. दरम्यान रेल्वेच्या डब्यात रक्ताचे थारोळे साचले होते. त्यानंतर गाडी रेल्वेस्थानकात आली. तेव्हा सामिया ही जोरजोरात ओरडत, मदतीची याचना करत होती. तेव्हा नियमित प्रवास करणारे प्रतिक साळुंके, आनंद ओव्हाळ आणि विश्वजीत पाचपुते यांनी या दोन्ही महिलांना रेल्वेगाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरविले. त्यानंतर झालेल्या घटनेची उकल रेल्वे प्रशासन आणि पोलीसांना झाली जर हे तीन युवक मदतीला धाऊन आले नसते तर या घटनेची खबर कुणालाही झाली नसती. मदतीला धाऊन आलेले युवक दुपार्पयत या मायलेकीसोबत दवाखान्यात होते. तसेच प्रतिक साळुंके या विद्याथ्र्याची एफवायबीएस्सीचा पुण्याला पेपर होता. मात्र पेपर बुडवून त्यांने सामाजिक बांधिलकी जोपासली.
 
जाता जाता वार झाले
सामिया सिन्हा ही मुलगी पुणो येथील कोथरुड परिसरात असलेल्या इंटरनॅशनल फॅशन डिझायन इन्स्टिटय़ुटमधून तिचा फॅशन डिझायनचा कोर्स पूर्ण झाला. गेल्या तीन वर्षापासून ती पुण्यात आहे. मात्र गेल्या महिन्यात छत्तीसगड येथे ती आपल्या गावी गेली होती. आईला घेऊन ती पुण्यात येणार होती. भाडेतत्वावर घेतलेले घर आणि सामान घेऊन या मायलेकी पुन्हा छत्तीसगड येथे जाणार होत्या. मात्र त्यांच्या जीवावर दुर्देवी घटना बेतली. यावेळी सामिया म्हणाली की, तीन वर्ष पुण्यात काढले मात्र काहीही झाले नाही जाता जाता मात्र हातावर वार झाले. ही दुर्देवाची बाब आहे. तसेच आम्ही 15 मिनिटे चोरटय़ांशी झुंज देत होतो. मात्र बोगीतील एकही प्रवाशी मदतीला आला नाही. काही चोरटे आमच्या हातावर वार करीत होते. तर काही रेल्वे बोगीवर दगडफेक करीत होते. 
 
पोलीसांची शेड की दारुचा अड्डा?
येथील सिल्पर कंपनीजवळील आऊटरला नेहमीच रेल्वे प्रवाशी गाडय़ा थांबविल्या जातात. हा परिसर निर्मनुष्य असून चोरटय़ांचे फावले जाते. कारण चोरटय़ांना पळ काढण्यासाठी मोकळी जागा आहे. गेल्या वर्षाभरात याठिकाणी घडलेल्या लुटमारीमुळे सिग्नलजवळ पोलीसांना गस्त घालण्यासाठी  शेड उभारलेला आहे. या शेडमध्ये रात्रीच्या वेळेला पोलीस असतात असे म्हटले जाते. सदरचा पोलीसांचा शेड बघून असे वाटते की हा पोलीसांचा शेड आहे की दारुचा अड्डा? जर पहाटेच्या वेळेला या शेडमध्ये पोलीस असते तर ही घटना घडली नसती. तेव्हा घटनास्थळी पोलीस नसावेत तसेच गाडीमध्ये असलेले सुरक्षारक्षक कुठे गेले होते असा प्रश्न प्रवाशी वर्गातून उपस्थित केला जात आहेत. 
 
ढिसाळ रेल्वे प्रशासनावर गुन्हे दाखल करणार
सिल्पर कंपनीजवळ नेहमीच प्रवाशी गाडय़ा का थांबविल्या जातात असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानकात फ्लॅटफॉर्म रिकामे असताना देखील फ्लॅटफॉर्म रिकामे नाहीत अशी सबब दाखवून रेल्वे गाडय़ा या निर्मनुष्य सिग्नलजवळ थांबविल्या जातात. याठिकाणी गाडय़ा थांबवू नये म्हणून रेल्वे पोलीसांनी रेल्वे प्रशासनाला वारंवार लेखी पत्रे दिली आहेत. कारण याचठिकाणी ब:याचदा लुटमारीचे प्रकार घडलेले आहेत. परंतु ढिसाळ रेल्वे प्रशासन याठिकाणी गाडय़ा थांबवून प्रवाशांच्या जीवाशी खेळतात आणि गुन्हेगारीला एकप्रकारे प्रवृत्त करतात, असा सूर प्रवाशांतून आहेत. तेव्हा प्रशासनाने निर्मनुष्य सिग्नलजवळ गाडय़ा थांबवू नये अन्यथा रेल्वे प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शहरातील सेवाभावी संघटनांनी घेतलेला आहे  

Web Title: Daulat was beaten with a sharp weapon on Mayaleki by throwing stones at Azadhind Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.