बारामती जवळील मेडद येथे वृद्धाचा कोयत्याने वार करून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 11:33 IST2019-06-04T11:32:25+5:302019-06-04T11:33:59+5:30
भावकीच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले.

बारामती जवळील मेडद येथे वृद्धाचा कोयत्याने वार करून खून
बारामती : बारामती शहरालागतच्या मेडद गावात व्रूद्धाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.सोमवारी ( दि 3)रात्री ही घटना घडली. जगन्नाथ एकनाथ गावडे ( वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भावकीच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले. त्यात कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने जगन्नाथ गावडे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे