Pune Crime: लोहियानगर परिसरात तरुणाचा खून; गळ्यावर मारहाणीच्या खुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 08:21 IST2023-07-31T08:19:52+5:302023-07-31T08:21:28+5:30

सोफ्यावर एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली....

Murder of youth in Lohianagar area; Beating marks on the neck | Pune Crime: लोहियानगर परिसरात तरुणाचा खून; गळ्यावर मारहाणीच्या खुणा

Pune Crime: लोहियानगर परिसरात तरुणाचा खून; गळ्यावर मारहाणीच्या खुणा

पुणे : लोहियानगर परिसरात अनोळखी तरुणाचा (वय ३५ ते ४० वर्ष) खून केल्याची घटना घडली. अधिक माहितीनुसार, नेहरू रस्त्यावरील महापालिकेच्या सोनवणे रुग्णालयासमोर पालिकेनेच बांधलेले जुने गाळे आहेत. त्यांचा वापर सध्या कोणी करत नाही. त्यामुळे गाळ्यांच्या आवारात कचरा टाकला जात आहे. तेथील मोकळ्या जागेत जुना सोफा ठेवला होता. सोफ्यावर एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली.

खडक ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संपतराव राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. तरुणाच्या गळ्यावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्याचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिस निरीक्षक संपतराव राऊत तपास करत आहेत.

Web Title: Murder of youth in Lohianagar area; Beating marks on the neck