Pune: धारदार शस्त्राने वार करून परप्रांतीय युवकाचा खून, शिरूर शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 17:49 IST2024-03-18T17:49:04+5:302024-03-18T17:49:32+5:30
शिरूर शहर परिसरातील धक्कादायक घटना...

Pune: धारदार शस्त्राने वार करून परप्रांतीय युवकाचा खून, शिरूर शहरातील घटना
शिरूर (पुणे) : शिरूर शहरात परप्रांतीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना घडली आहे. मोहताब शाहिद आलम (वय.२६, रा. बिहार, सध्या रा. भैरवनाथ बिल्डिंग बाबूरावनगर, शिरूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर या प्रकरणी मोहम्मद समिद मासूम यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व फिर्यादी मोहम्मद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत युवक मोहताब हा मोहम्मद याचा चुलत भाऊ आहे. रविवारी रात्री जेवणानंतर वेगवेगळ्या खोलीत हे दोघेही झोपले होते. सकाळी मोहम्मद याला जाग आल्यानंतर खोलीची कडी बाहेरून लावल्याचे लक्षात आले. तसेच मोहताबचा फोनही बंद असल्याने त्याने दुसरा चुलत भाऊ सोयल शरीफ मन्सूरी याला फोन करून बोलावले. त्यानंतर दोघांनीही मोहताब यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता, त्याचा गळा चिरला असल्याचे व मृतावस्थेत आढळून आल्याचे दिसले.
या घटनेची माहिती कळताच शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच या प्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.