पुण्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' पतीचा खून; हांडेवाडी परिसरात मृतदेह पुरला होता मातीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:20 PM2022-03-20T20:20:55+5:302022-03-20T20:21:11+5:30

शनिवारी सकाळी पती बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात दिली होती

Murder of husband who went missing in Pune The body was buried in Handewadi area | पुण्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' पतीचा खून; हांडेवाडी परिसरात मृतदेह पुरला होता मातीत

पुण्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' पतीचा खून; हांडेवाडी परिसरात मृतदेह पुरला होता मातीत

googlenewsNext

पुणे : हांडेवाडी परिसरात बेपत्ता असलेल्या पतीचा खून करून मृतदेह मातीत पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी पती बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात दिली होती. त्याचा शोध घेतला जात असताना त्याचा मृतदेह मिळून आला आहे. किरण रोहिदास हांडे (वय २०, रा. उरूळी कांचन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती अशी, किरण याचा प्रेम विवाह झालेला असून, तो हांडेवाडी परिसरात पत्नीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचे आई-वडिल पुण्यात राहतात. तो एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्याला याच परिसरातील तीन ते चार मित्र आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी तो घरी न आल्याने त्याच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलीस व त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना हांडेवाडी येथील पाटील व्ह्यु सोसायटीच्या मागील बाजूला मोकळ्या मैदानात दारू पिण्यास बसले होते, अशी माहिती मिळाली.

नातेवाईकांनी तेथे येऊन पाहणी केली असता त्यांना मातीत पुरलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक सुभाष काळे व पथकाने याठिकाणी धाव घेतली. त्याचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरला असण्याची शक्यता आहे. संशयितांकडे चौकशी केली जात असून, एक संशयित फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Murder of husband who went missing in Pune The body was buried in Handewadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.