गळ्यावर वार करून नसाही कापल्या, दिवसाढवळ्या पती-पत्नीचा खून; बारामतीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:50 PM2024-04-13T18:50:06+5:302024-04-13T19:07:08+5:30

गळ्यावर वार असून हाताची नस कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत...

murder of husband and wife in baramati broad daylight pune latest crime news | गळ्यावर वार करून नसाही कापल्या, दिवसाढवळ्या पती-पत्नीचा खून; बारामतीत खळबळ

गळ्यावर वार करून नसाही कापल्या, दिवसाढवळ्या पती-पत्नीचा खून; बारामतीत खळबळ

- प्रशांत ननावरे

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कसबा जामदार रोड परिसरात एका इमारतीमधील सदनिकेत पती पत्नीचा भरदिवसा खून झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि. १३) सकाळी ११.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. खत्री पवार एन्क्लेव्ह असे या इमारतीचे नाव आहे. या अपार्टमेंटमध्ये भरदिवसा हा प्रकार घडला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन महालिंग वाघोलीकर (वय ५०) आणि सारिका सचिन वाघोलीकर (वय ४२) असं खून झालेल्या दांपत्याचे नाव आहे. त्यांच्या शरिरावर वार केल्याच्या खुणा आहेत. तसेच हाताची नस कापल्याचं दिसून आलं आहे. या घटनेची माहिती  मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शहरातील खत्री पवार एन्क्लेव्ह या इमारतीमध्ये बी ४ या इमातीमध्ये दुसऱ्या मजल्यावर वाघोलीकर दांपत्य राहत होते. त्यांच्या गळ्यावर वार असून हाताची नस कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. या दाेघांचा जुन्या आर्थिक वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पोलीस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यात यशस्वी ठरले आहे.

ही घटना घडली त्यावेळी वाघोलीकर दांपत्याची मुले कण्हेरी इथं देवदर्शनासाठी गेले होते. मुले परत आल्यानंतर त्यांच्या सदनिकेला बाहेरुन कडी लावल्याचे दिसून आले. कडी काढून दरवाजा उघडल्यानंतर वाघोलीकर दांपत्याचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आले. तसेच बेडरुममधील कपाट, दुसऱ्या खोलीतील डबे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

Web Title: murder of husband and wife in baramati broad daylight pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.