शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीची छेड काढल्याने सराईत गुन्हेगाराचा खून; लष्करमधील खूनाचा उलघडा, तिघांना अटक

By विवेक भुसे | Updated: January 14, 2024 15:29 IST

गुन्हेगारावर प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे किमान २५ गुन्हे दाखल होते

पुणे : अरबाज हा सराईत गुन्हेगार लोकांना मारहाण करुन खिशातील पैसे काढून घेत. विक्रेत्यांच्या वस्तू उचलून घेऊन जात असे. यामुळे त्याला सर्वच त्रासले होते. आई बहिणीवरुन शिवीगाळ करत असे. त्याने एकाच्या बहिणीची छेड काढली, त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी कट रचून या सराईत गुन्हेगाराचा काटा काढला. लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर खूनामागचे खरे कारण आता समोर आले आहे.

फैजान रफिक शेख (वय २६, रा. चुडामण तालीमजवळ, भवानी पेठ), गुफरान मुज्जफर मोमीन (वय २१, रा. याकुबनगर चौक, भवानी पेठ) आणि जगदीश शंकर दोडमणी (वय २२, रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अरबाज ऊर्फ बबन इकबाल शेख (वय ३५, रा. भवानी पेठ) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. खूनाची ही घटना ताबुत स्ट्रिटवरील सार्वजनिक रोडवर शनिवारी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज शेख याच्यावर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे किमान २५ गुन्हे समर्थ व खडक पोलीस ठाण्यात दाखल होते. भवानी पेठ आणि कॅम्प भागातील विक्रेत्यांवर तो दादागिरी करीत असे. गाड्यांवर मोफत खाणे, विक्रेत्यांकडील वस्तू जबरदस्तीने उचलून नेणे असे प्रकार तो करत असे. त्याच्या दादागिरीमुळे परिसरातील लोक वैतागले होते. पोलीस आयुक्तांनी शेख याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करुन त्याला स्थानबद्ध केले होते. दहा दिवसांपूर्वीच त्याची सुटका झाली होती.

सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने एका महिलेची छेड काढली होती. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी कट रचला. त्याला मध्यरात्रीनंतर ताबुत स्ट्रिट येथे बोलावले. यावेळी त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा आरोपींनी धारधार शस्त्राने त्याच्या डोक्यावर, खांद्यावर, पोटावर, छातीवर व हनुवटीवर सपासप वार करुन त्यांचा खून केला. पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूjailतुरुंग