प्रेमप्रकरणातून प्रेयसीची निर्घृण हत्या ; आराेपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 16:30 IST2019-02-24T16:29:45+5:302019-02-24T16:30:49+5:30

प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत खून करुन आराेपी फरारी झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नऱ्हे येथे घडली आहे.

murder of girl by her boyfriend | प्रेमप्रकरणातून प्रेयसीची निर्घृण हत्या ; आराेपी फरार

प्रेमप्रकरणातून प्रेयसीची निर्घृण हत्या ; आराेपी फरार

नऱ्हे: प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत खून करुन आराेपी फरारी झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नऱ्हे येथे घडली आहे. साेनाली आनंदराव भिंगारदिवे (वय 23, मूळ रा. विजयनगर, कराड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. साेनाली येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत हाेती. साेनाली मंगळवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पाेलिसांकडे केली हाेती. याप्रकरणी पाेलीस संशयित आराेपी साेमेश घाेडकेचा शाेध घेत आहेत.  

साेमेश हा महाविद्यालयाजवळ भाड्याने रुम घेऊन राहत हाेता. त्याने घरमालकाला त्यांचे लग्न झाल्याचे सांगितले हाेते. साेमेश हा साेनालीच्या चारित्र्यावर संशय घेत हाेता. या रागातूनच 19 तारखेला त्याने तिचा गळा चिरुन खून घेल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तवला आहे. खून केल्यानंतर आराेपी घराला बाहेरुन कडी लावून फरार झाला. आजूबाजूच्या नागरिकांना घरातून उग्र वास येत आल्याने त्यांनी घरमालाकाला कळविले. घर उघडून पाहिले असता साेनाली मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनी पाेलिसांशी संपर्क केला. याप्रकरणी सिंहगड पाेलीस अधिक तपास करीत आहेत. 

दरम्यान आराेपीने खून केल्यानंतर चिठ्ठी लिहून ठेवली असून आत्महत्या करणार असल्याचे त्यात नमूद केले आहे. 
 

Web Title: murder of girl by her boyfriend