पुरंदर तालुक्यात दगडाने ठेचून माजी उपसरपंचाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:18 IST2018-08-01T14:15:35+5:302018-08-01T14:18:03+5:30
पूर्ववैमनस्यातून हल्ला करताना अगोदर आरोपींनी संतोष दळवी यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फसल्याने त्यानंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केला.

पुरंदर तालुक्यात दगडाने ठेचून माजी उपसरपंचाचा खून
पुरंदर:पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे पूर्ववैमनस्यातून माजी उपसरपंच संतोष साधू दळवी (वय ३६)याचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान घडली. याप्रकरणी साधू अनंता दळवी (वय-६०, भिवरी, ता.पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दादासाहेब कटके, दत्तात्रय कटके, भरत कटके, हेमंत गायकवाड, अक्षय गायकवाड, दिपक भांडवलकर, आदेश पवार, मोहन गायकवाड, बाळू गायकवाड (सर्व.रा. भिवरी, ता. पुरंदर)या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करताना अगोदर आरोपींनी संतोष दळवी यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला मात्र, तो प्रयत्न फसल्याने त्यानंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केला. अंधाराचा फायदा घेत हा गुन्हा केला आहे. याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नसून या घटनेचा पुढील तपास सासवड पोलीस करत आहे.