चिंचवडमध्ये दगडाने ठेचून युवकाचा खून, पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचे सत्र सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:49 IST2017-09-25T14:48:12+5:302017-09-25T14:49:56+5:30
चिंचवडमधील विद्यानगर येथे आरएन चौकाजवळ अज्ञात इसमाकडून युवकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.
_201707279.jpg)
चिंचवडमध्ये दगडाने ठेचून युवकाचा खून, पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचे सत्र सुरूच
पिंपरी : चिंचवडमधील विद्यानगर येथे आरएन चौकाजवळ अज्ञात इसमाकडून युवकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.इम्रान मुसा शेख (वय 19) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत इम्रान याचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? या अनुषंगाने पोलीस माहिती घेत आहेत.पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चिंचवड, केशवनगर येथे रविवारी सकाळी एका कामगाराचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच, पिंपरी पोलिसांच्या हद्दीत विद्यानगर येथील खुनाची घटना उघडकीस आली. खून सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.