शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण; कुख्यात गुंड गजा मारणेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 17:53 IST

मारहाणीवेळी स्वत: गजा मारणे जरी घटनास्थळी नसला तरी टोळी प्रमुख म्हणून तो रडारवर आला आहे

पुणे : आयटी अभियंत्याला १९ फेब्रुवारी रोजी मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह त्याच्या टोळीविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या मारहाणीवेळी स्वत: गजा मारणे जरी घटनास्थळी नसला तरी टोळी प्रमुख म्हणून तो रडारवर आला आहे. कायद्याचे उल्लंघन करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याची पुणेपोलिसांची भूमिका घेतली आहे. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेला अखेर अटक करण्यात आली आहे. 

अभियंता मारहाणप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१) आणि अमोल विनायक तापकीर (३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौथा आरोपी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा पसार झाला आहे. त्यांच्याविरोधात यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. देवेंद्र पुरुषोत्तम जोग (३३, रा. मयूर कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.

पूर्ण ताकदीने तपास सुरु 

मारहाण प्रकरणात टोळी प्रमुख गजानन मारणे यालाही आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली असून, आरोपींसह गुन्ह्यासंदर्भात ७४ घरांची झडती घेतला आहे. आरोपींविरोधात मोक्का कारवाई करण्यासाठी कोथरूड पोलिसांनी कागदपत्रांची मोठ्या प्रमाणावर पूर्तता केली. पूर्ण ताकतीने या केसचा तपास सुरू आहे, मोबाइल ट्रॅकिंग, सीसीटीव्ही कॅमेरे यांच्याद्वारेदेखील तपास सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

गाडीचा धक्का लागल्यावरून मारहाण 

देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मारहाण झाल्यावर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीची कलमे दाखल केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यामध्ये आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले. जोग हे १९ फेब्रुवारी रोजी घरी जाताना रस्त्यावर गर्दी असल्याने ते बाजूला थांबले होते. त्यावेळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. त्याबाबत त्यांनी वडिलांसोबत कोथरूड पोलिस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :Puneपुणेkothrud policeकोथरूड पोलीसmurlidhar moholमुरलीधर मोहोळPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा