शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यासाठी शेवाळेवाडी गावची पाहणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:06 IST

शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा योजना कशी असली पाहिजे, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरू केला आहे.

हडपसर : शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महापालिकेने सकारात्मकता दर्शवली आहे. गावातील प्रत्येक भागाला पुरेशा प्रमाणात चांगल्या दाबाने शेवटपर्यंत पाणी मिळेल, असे नियोजन केले जात आहे. त्यानुसार महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२) शेवाळेवाडी गावाची पाहणी केली.

गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करावा, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यांनी या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन महापालिका आयुक्तांना याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा अधिकारी तसेच शेवाळेवाडी ग्रामस्थ यांची बैठक घेतली होती. त्यानुसार गुरुवारी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व लष्कर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी शेवाळेवाडी गावात बंद नळाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पाहणी केली.यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता राजेश शिंदे, उपअभियंता दत्तात्रय टकले, कनिष्ठ अभियंता सादिक पठाण, कनिष्ठ अभियंता अश्विनी वाघमारे, डीपीआर प्रमुख राजेंद्र किकले यांच्यासह शेवाळेवाडी गावातील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे, माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, विजय कोद्रे, विलास शेवाळे, संजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, मंगेश शेवाळे, बाळकृष्ण शेवाळे, मोहन कामठे, सार्थक शेवाळे, भारत कोद्रे आदी उपस्थित होते.

राहुल शेवाळे म्हणाले, शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा योजना कशी असली पाहिजे, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अधिकाऱ्यांनी गावातील प्रत्येक भागाला बंद नळाने कसे पाणी मिळेल याची पाहणी केली. गावची लोकसंख्या साधारणपणे २५ हजार इतकी आहे. भविष्यात लोकसंख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळे पुढील तीस वर्षांपर्यंत हा पाणीपुरवठा पुरेसा व योग्य दाबाने होईल. या प्रमाणे योजना करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीwater shortageपाणीकपातMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या