महापालिकची उरुळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये ‘टीपी स्कीम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 21:28 IST2019-01-10T21:24:54+5:302019-01-10T21:28:45+5:30

पीएमआरडीएकडून पुण्याभोवती तयार करण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या टप्प्यात येत असलेल्या दोन गावांमध्ये महापालिका तीन ठिकाणी टीपी स्किम राबविणार आहे.

Municipal Corporation's 'TP Scheme' in Uruli God and Fursungi | महापालिकची उरुळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये ‘टीपी स्कीम’

महापालिकची उरुळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये ‘टीपी स्कीम’

पुणे : पीएमआरडीएकडून पुण्याभोवती तयार करण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या टप्प्यात येत असलेल्या दोन गावांमध्ये महापालिका तीन ठिकाणी टीपी स्किम राबविणार आहे. उरुळी देवाची येथे एक तर फुरसुंगीमध्ये दोन ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे.  शहर सुधारणा समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. 

                 महापालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या अकरा गावांपैकी असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधून जात आहे. या गावांमध्ये तीन ठिकाणी टीपी स्किम राबविण्यात येणार असून त्यासाठी पीएमआरडीएकडून तांत्रिक मदत (टेक्निकल सपोर्ट) घेतली जाणार आहे. ही गावे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट होण्यापुर्वी पीएमआरडीएने याबाबतचा आराखडा तयार केला होता. तो आराखडा महापालिकेला सुपुर्द करण्यात आला. 

                त्यानुसार प्रशासनाने टिपी स्किम करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. संबंधित जमिन मालकांनी या योजनेला संमती दर्शविली असून या योजनेसाठी इरादा जाहीर केला जाणार आहे. फुरसुंगी गावामधील सुमारे ३९ किमी लांबीच्या आणि उरुळी देवाची येथील ७३० मीटर लांबीच्या रस्त्याची जागा विना मोबदला प्राप्त होणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. जमिनधारकांसोबत भागीदारी पध्दतीने नियोजन करून परिसराचा सुनियोजित विकास करुन वाहतूक कोंडी, पाणी व इतर समस्या सोडविता येणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव शहर सुधार समितीसमोर मांडण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली. ही टीपी स्किम पालिकेकडून जवळपास ३० वर्षांनंतर राबविण्यात येत आहे. याठिकाणी टीपी स्किम केल्यास रस्त्यासाठीच्या भूसंपादनामधील अडथळे बºयाच अंशी कमी होतील आणि विकासकामांना गती मिळेल असे समितीचे अध्यक्ष सुशिल मेंगडे यांनी सांगितले. त्याला प्रशासनाचीही मान्यता मिळालेली असून प्रशासनाकडून यावेळी प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. 

Web Title: Municipal Corporation's 'TP Scheme' in Uruli God and Fursungi