Exam : महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांची रविवारी परीक्षा; १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:21 IST2026-01-23T09:20:43+5:302026-01-23T09:21:32+5:30

महापालिकेने २०२२-२३ मध्ये विविध पदांसाठी ७४८ जागांची भरती केली. त्यानंतर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली.

Municipal Corporation Junior Engineer Exam on Sunday; Recruitment process for 169 posts | Exam : महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांची रविवारी परीक्षा; १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया

Exam : महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांची रविवारी परीक्षा; १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया

पुणे : महापालिकेच्या १६९ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या भरतीसाठी रविवारी (दि. २५) राज्यातील ६ महसुली विभागांतील २० जिल्ह्यांमध्ये ६९ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. महापालिकेत विविध श्रेणी व पदांच्या हजारो जागा रिक्त आहेत. अभियंता श्रेणीतील जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

महापालिकेने २०२२-२३ मध्ये विविध पदांसाठी ७४८ जागांची भरती केली. त्यानंतर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये ४१ हजार २७३ परीक्षार्थ्यांनी अर्ज केले. यासाठी १ डिसेंबर २०२५ रोजी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता महापालिकेची निवडणूक संपल्याने रखडलेली परीक्षा येत्या रविवारी (दि.२५) राज्यातील २० शहरात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.

कोणत्याही परीक्षार्थ्याने परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेच्या संदर्भात तसेच नोकरी देण्याबाबत कोणी पैसे मागणी केली असेल, प्रलोभने दाखवत असेल, तर त्यास बळी पडू नये किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

Web Title : पुणे महानगरपालिका जूनियर इंजीनियर परीक्षा इस रविवार को पुनर्निर्धारित

Web Summary : पुणे महानगरपालिका में 169 जूनियर इंजीनियर पदों के लिए परीक्षा इस रविवार को 20 जिलों में होगी। मूल रूप से दिसंबर 2025 के लिए योजना बनाई गई थी, लेकिन चुनाव प्रोटोकॉल के कारण इसे स्थगित कर दिया गया था। पीएमसी उम्मीदवारों से घोटालों और झूठे वादों से बचने का आग्रह करता है।

Web Title : Pune Municipal Corporation Junior Engineer Exam Rescheduled for This Sunday

Web Summary : Pune Municipal Corporation's junior engineer exam for 169 positions is set for this Sunday across 20 districts. Originally planned for December 2025, it was postponed due to election protocols. The PMC urges candidates to avoid scams and false promises.