शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला रेव्हेन्यू कमिटीचा विसर

By admin | Updated: July 28, 2015 04:33 IST

राज्य शासनाकडून एलबीटी कर रद्द केल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. उत्पन्नवाढीसाठी रेव्हेन्यू कमिटी स्थापन करण्याचा निर्णय

पुणे : राज्य शासनाकडून एलबीटी कर रद्द केल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. उत्पन्नवाढीसाठी रेव्हेन्यू कमिटी स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेने मे २०१४मध्ये घेतला होता; मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तातडीने या समितीची स्थापना करून मनपाच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्याचे प्रयत्न करण्याची मागणी उपमहापौर आबा बागूल यांनी केली आहे.महापालिकेला दर वर्षी १,३०० कोटी रुपयांचे उत्पन्न एलबीटी करामधून मिळत होते. मात्र, राज्य शासनाने ५० कोटींखालील व्यापाऱ्यांचा एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेचे अंदाजपत्रक अडचणीत आले आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीचे व्यवहार्य मार्ग शोधून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. या मिळकतींची योग्य नोंद होत नाही. मिळकतींकडून करांचा भरणा वेळेवर केला जात नाही; त्यामुळे त्यांच्याकडून वाहनांप्रमाणे वन टाइम टॅक्स आकारण्यात यावा. मिळकतींचे जीआयएस पद्धतीने मॅपिंग करावे. उत्पन्नवाढीसाठी नवे होर्डिंग धोरण आखून टेंडर पद्धतीने दिली जावीत. बांधकामांना ०.४ टक्के प्रिमीयम एफएसआय देण्यात यावा, त्यातून महापालिकेला ४०० ते ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, असे आबा बागुल यांनी स्पष्ट केले आहे. आयटी संस्थांना सवलतीच्या दराने मिळकत करआकारणी करण्यात आली आहे; त्यांच्याकडून व्यावसायिक दराने करआकारणी करावी. आरटीओकडे जमा होणारा वाहन टॅक्स व राज्य शासनाकडील करमणूक कर यांतील वाटा महापालिकेला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. आर्थिक उत्पन्नवाढीसाठी सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात यावी आदी सूचना आबा बागुल यांनी केल्या आहेत.