शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

मुंबई-पुणे मार्गाची ‘हायपरलूप वन’ कडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 8:15 PM

शासन आणि लॉस एंजेलिसमधील ‘हायपरलूप’ यांच्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे - मुंबई हायपरलूप संदर्भात सामंजस्य करार झाला आहे

ठळक मुद्देपीएमआरडीए आणि हायपरलूप कंपनीकडून संयुक्तपणे हा अहवाल जलद वाहतुकीची सुविधा देणा-या या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम सुरू

पुणे: पुणे-मुंबई दरम्यान हायपलूप या नवीन प्रकाराच्या वाहतुकीचा वापर करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून  मंगळवारी ‘हायपरलूप वन ’या कंपनीच्या पदाधिका-यांनी प्रस्तावित मार्गाची पाहणी केली.त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.कंपनीकडून पुढील सहा महिन्यात या संदर्भातील व्यवहार्यता अभ्यास अहवाल पीएमआरडीएमार्फत शासनास सादर केला जाणार आहे. शासन आणि लॉस एंजेलिसमधील ‘हायपरलूप’ यांच्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे - मुंबई हायपरलूप संदर्भात सामंजस्य करार झाला आहे. हायरपरलूप कंपनीकडून पुणे-मुंबई मार्गाचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल पीएमआरडीएला सादर करण्यात आला. आता अतिजलद वाहतुकीची सुविधा देणा-या या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पीएमआरडीए आणि हायपरलूप कंपनीकडून संयुक्तपणे हा अहवाल केला जात आहे.त्याचा सर्व खर्च हायपरलूपकडून करणार आहे. मुंबई आणि पुणे विभागांतील महानगर प्रदेशांना  हायपरलूप तंत्रज्ञानाने जोडल्यास २० मिनिटांपेक्षा कमी वेळेत प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र,त्याची व्यवहार्यता तपासून मगच हा प्रकल्प करण्यात येणार आहे.किरण गित्ते म्हणाले, हायपरलूपसाठी आवश्यक परवानग्या, त्यासाठी लागणारी जमीन,अभियांत्रिकी आव्हाने याबाबतची पाहणी   ‘हायपरलूप वन’च्या पदाधिका-यांकडून सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून कंपनीचे पदाधिकारी मुंबईत आहेत. मंगळवारी कंपनीच्या पदाधिका-यांनी प्रस्तावित मार्गाची पाहणी केली.पुढील सहा महिन्यात त्यांच्याकडून यावरील व्यवहार्यता अभ्यास अहवाल प्राप्त होईल. हा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल.शासनाकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गKiran Gitteकिरण गित्तेPMRDAपीएमआरडीए