शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर ५ तास मुंबई-बंगळुरू महामार्ग थांबला

By admin | Updated: June 12, 2015 06:13 IST

भरधाव डंपरने दहा ते बारा वाहनांना दिलेल्या धडकेने, झालेल्या भीषण अपघातामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. र

पुणे : भरधाव डंपरने दहा ते बारा वाहनांना दिलेल्या धडकेने, झालेल्या भीषण अपघातामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारणपणे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल पाच तास झालेल्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी मुंबईकडून-बंगळुरूला जाणाऱ्या बाजूने एकपदरी वाहतूक सुरूकरून दिली होती.वडगाव पुलाजवळ सकाळी साधारणपणे आठच्या सुमारास डंपरचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस घटनास्थळी धावले. दरम्यान, अग्निशमन दलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. वाहतूककोंडी झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रासह कात्रज आणि सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रावरील वाहने पोहोचण्यास उशीर लागला. विरुद्ध बाजूने (नो-एंट्री) वाहने घालून; तसेच छोट्या दुभाजकांवरून चालवत ही वाहने घटनास्थळापर्यंत नेण्यात आली.मुंबईकडून येणारी वाहतूक एक पदरी करुन दुसऱ्या बाजूने मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली होती. दरम्यान, अपघातामुळे रस्त्यावर तुटून पडलेली झाडेही तत्काळ बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. मदतकार्य सुरू असताना सेवा रस्त्यावरचीही वाहतूक बंद केल्यामुळे महामार्गावरील कोंडीमध्ये आणखी भर पडली होती.