शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

पुणे, पिंपरी- चिंचवडसाठी मुळशी धरणाचे पाणी हाच एकमेव पर्याय : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 21:20 IST

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची गरज

ठळक मुद्देशहर, जिल्ह्यात धरणासाठी एकही साईट शिल्लक नाही

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची गरज देखील वाढत आहेत. परंतु यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र धरण बांधण्यासाठी एकही साईट शिल्लक नाही. त्यामुळे या दोन्ही शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी टाटाचे मुळशी धरण हाच एक पर्याय असून, या संदर्भांत चर्चा सुरु असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.     पुणे विभागातील सर्व जिल्ह्याचा सन २०२०-२१ या वर्षांचा जिल्हा नियोजना संदर्भांत आढावा बैठक सोमवारी (दि.२७) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाता उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी वरील माहिती दिली. पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, पाण्यावर होणार खर्च लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र धरण बांधलेले परवडेल. याबाबत पवार  म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही जिल्ह्यात काम करतोय. पण पुणे जिल्ह्यात धरणासाठी एकही साईड शिल्लक नाही. त्यामुळे नवे धरण बांधणे शक्यच नाही. यासाठी केवळ मुळशी धरणाचा पर्याय आहे. परंतु या धरणाच्या पाण्यावर प्रामुख्याने वीज निर्मिती केली जाते. शासनाने पाण्या संदर्भांत धोरण निश्चित आहे. यामध्ये प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून, नंतर शेती आणि नंतर औद्योगिक वापरासाठी आहे. यामुळे मुळशी धरणातील पाणी शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी वापरता येऊ शकते, असे पवार यांनी येथे सांगितले.     दरम्यान कृष्णा खोरे तंटा लवादाने दिलेल्या निर्णयानुसार पाणी वाटप केले जाते. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांसाठी पाणी वाटपाचे सूत्र ठरले आहे. सध्या धरण बांधण्यासाठी एक ही साईट शिल्लक राहिली नाही. मुळशी धरण हे टाटांनी वीजनिर्मितीसाठी बांधले आहे. त्यातून वीजनिर्मिती केली जाते. पीक- अव्हर्समध्ये वीजनिर्मिती करण्यात यावी. त्याचबरोबर वीजनिर्मितीसाठी सौर उर्जा, पवन उर्जा आणि अणुउर्जा यांचा वापर वाढविण्यात यावा.  यामुळे भविष्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला मुळशी धरणातून पाणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ----------------मेट्रो, एचसीएमटीआर लोकांचे हित लक्षात घेऊन निर्णयपुणे शहरातील प्रस्तावित वाढीव मेट्रो मार्ग आणि एचसीएमटीआर प्रकल्प राबविताना केवळ लोकांचे हित आणि पुढील ५० वर्षांचा शहराचा विकास लक्षात घेऊनच निर्णय घेण्यात येतील. यामध्ये कोणत्याही स्वरुपांचा राजकारण केले जणार नाही. यासाठी राष्ट्रवादीचा पांठिबा आणि काँगे्रसचा विरोध किंवा अन्य एखाद्या पक्षाची भूमिकांडे लक्ष दिले जाणार नाही. शहर आणि जिल्ह्यामध्ये कोणतेही प्रकल्प राबविताना नागरिकांचे हित, शहराची गरज लक्षात घेऊन विविध तज्ज्ञ सल्लागारांचे विचार घेऊनच राबविण्यात येईल, असे स्पष्ट मत पालकमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका