शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू;सांगवीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 20:16 IST

रोहित्रास बिघाड झाल्याने वीजपुरवठा झाला होता खंडित; स्थानिकांनी केली होती तक्रार

ठळक मुद्देहात व कमरेसह शरीराचा अर्धा भाग जळाल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी : विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. यात हात व कमरेसह शरीराचा अर्धा भाग जळाल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. नवी सांगवी येथील फेमस चौक येथे मंगळवारी (दि. ११) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.  हनुमंत नागनाथ भिसे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, लेन न. ३, पिंपळे गुरव, मूळ गाव - गोढाळा, ता. रेणापूर, जि. लातूर) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. भिसे यांच्या मागे पत्नी, दोन मुले असून, त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांची बहीण देखील राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.प्राथमिक माहितीनुसार, नवी सांगवी येथील फेमस चौक येथील शनि मंदिराजवळ असलेल्या नरसिंह रेसिडेंसी या सोसायटीच्या लगत विद्युत रोहीत्र आहे. या रोहित्रास बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत स्थानिकांनी महावितरण कंपनीच्या जुनी सांगवी येथील शाखा कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या कार्यालयातील चार ते पाच कर्मचारी एका वाहनातून फेमस चौक येथे दाखल झाले. त्यावेळी लाइनमन हनुमंत भिसे आणि अन्य एक कर्मचारी रोहित्रातील बिघाडाची पाहणी करण्यासाठी वाहनातून खाली उतरले. रोहित्र उंचावर असल्याने लाइनमन भिसे वर चढले तर दुसरा कर्मचारी खाली थांबला होता. त्यावेळी भिसे यांना विजेचा धक्का बसून ते खाली पडले. विजेच्या धक्क्याने भिसे यांचा एक हात तसेच कमरेला भाजले. शरीराचा अर्धा भाग जळाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, इतर कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत जुनी सांगवी येथील महावितरणच्या शाखा कार्यालयाचे उपअभियंता रत्नीदीप काळे यांना माहिती दिली. त्यानंतर उपअभियंता काळे यांनी सांगवी पोलिसांना माहिती दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :SangviसांगवीmahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारीDeathमृत्यू