शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आरटीओच्या ‘फिटनेस’साठी आंदोलन; दरमहा १२ हजार वाहने विना पासिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:30 PM

शहरातील १ लाख ८० हजार वाहनांची दरवर्षी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देसरासरी एका दिवसाला ६६० वाहनांची तपासणी होणे आवश्यक २९ मोटार वाहन निरीक्षक अणि सहा मोटार वाहन निरीक्षकांवर वाहन तपासणीचा भार

पुणे : वाहनांच्या तुलनेत मनुष्यबळाचा अभाव, त्यातच कामात कसूर केल्यामुळे निलंबित करण्यात आलेला कर्मचारी वर्ग यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचाच (आरटीओ) फिटनेस ढासळला आहे. त्यामुळे दरमहा १२ हजार वाहने विना पासिंगची राहत आहेत. वाहनांचे पासिंग करण्याची सुविधा सुकर व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक व प्रतिनिधी महासंघाच्या वतीने बुधवारी (दि. १९) आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शहरातील १ लाख ८० हजार वाहनांची दरवर्षी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक आहे. वर्षातून सरासरी २७५ दिवस आरटीओचे कामकाज चालते. त्यामुळे सरासरी एका दिवसाला ६६० वाहनांची तपासणी होणे आवश्यक आहे. सध्या सरासरी तीनशे ते साडेतीनशे वाहनांचे पासिंग केले जाते. उर्वरीत वाहने विनापासिंग राहत आहेत. त्यामुळे दरमहा सुमारे १२ हजार वाहनांचे पासिंग होत नाही. शहरासाठी मोटार वाहन निरीक्षकांची ५८ पदे मंजुर आहेत. सध्या १७ अधिकारी निलंबीत आहेत. त्यामुळे २९ मोटार वाहन निरीक्षक अणि सहा मोटार वाहन निरीक्षकांवर वाहन तपासणीचा भार आहे. वाहनसंख्येच्या तुलनेत तपासणीसाठी अत्यल्प मनुष्यबळ आहे. विनापासिंग वाहन रसत्यावर आल्यास १४ हजार रुपयांचा दंड आहे. तसेच, अशा वाहनांचा अपघात झाल्यास विमा भरपाई देखील मिळत नाही. अशा दुहेरी कात्रीत वाहन चालक आणि मालक सापडले आहेत. याशिवाय दिवे घाटातील वाहन चाचणी ट्रक जवळ स्वच्छतागृह, शेड, कॅन्टीन अशी कोणतीच सुविधा नाही. पासिंगसाठी येणाऱ्या वाहनांनकडून देखील शंभर रुपये वाहन पार्किंग शुल्क आकारले जाते. ही अन्यायकारक प्रथा बंद करुन प्राथमिक सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. प्रकाश जगताप, चंद्रकांत हरफळे, प्रदीप भालेराव आणि बापू भावे या वेळी उपस्थित होते.  

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर