शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर फोडून कारखानदारी

By admin | Updated: August 8, 2015 00:40 IST

खराबवाडी व कुरुळीत दिवसाढवळ्या डोंगर पोखरण्याचे काम सुरू असून, टेकड्यांचे संरक्षण करण्याऐवजी लचके तोडण्याचे काम सुरू असल्याचे चित्र चाकण औद्योगिक परिसरात पाहावयास मिळत आहे.

चाकण : खराबवाडी व कुरुळीत दिवसाढवळ्या डोंगर पोखरण्याचे काम सुरू असून, टेकड्यांचे संरक्षण करण्याऐवजी लचके तोडण्याचे काम सुरू असल्याचे चित्र चाकण औद्योगिक परिसरात पाहावयास मिळत आहे. वाघजाई नगर रस्त्यावरील डोंगर एका उद्योजकाने डोंगर मधोमध फोडून दुभंगला आहे. त्यामुळे टेकडीवरील दत्ताचे मंदिर कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोंगर टेकड्या फोडून पर्यावरणाची हानी करणा-या व टेकड्यांचे सौंदर्य नष्ट करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. चाकण औद्योगिक परिसरातील खराबवाडी, वाघजाईनगर, कडाचीवाडी, महाळुंगे इंगळे, कुरुळी, निघोजे, वराळे, कोरेगाव खुर्द, भांबोली, वाकी, रासे, चिंबळी, केळगाव या गावांमध्ये अनधिकृतपणे टेकड्या फोडून मुरूम व डबर या गौण खनिजाचे उत्खनन सुरु आहे. डोंगर टेकड्या फोडून उद्योजकांनी कपारीमध्ये कारखाने उभे केले आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून संबंधित खात्याने बांधकामाची परवानगी दिली कशी, असा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे. कुरुळी येथे पुणे - नाशिक महामार्गालगत मोठा डोंगर भुईसपाट होत आहे. प्रशासन या गोष्टींकडे कसा काणाडोळा करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकांनी हायवे लगत डोंगर पोखरून बांधकामे केली आहेत. वाघजाई नगर येथील डोंगर मधोमध फोडून रस्ता केला आहे. या डोंगरावर दत्ताचे मंदिर, खराबवाडीच्या डोंगरावर महादेवाचे मंदिर, निघोजे येथील डोंगरावर पार्वती मंदिर व कुरुळीच्या डोंगरावरही एक मंदिर असल्याने हे डोंगर अर्धे शिल्लक आहेत. अन्यथा हे डोंगर संपूर्ण भुईसपाट झाले असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.ज्या ठिकाणी डोंगर अद्याप भुईसपाट झाले नाहीत, त्या ठिकाणी प्रशासनाने व स्वयंसेवी संघटनांनी वृक्षारोपण करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. टेकड्या नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)