शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेमात आईचा अडथळा, मुलाने केला आईचा खून, लोणीकंद येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 13:41 IST

आरोपी मुलानेच केली पोलिसांकडे फिर्याद

ठळक मुद्देप्रेयसीशी संगनमत करून प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईचा खून

लोणीकंद: मुलाने आपल्या प्रेमप्रकरणात आईचा अडथळा निर्माण होत असल्याने प्रेयसीसोबत संगनमत करून आईचा खून केल्याची गंभीर घटना  वढु खुर्द (ता. हवेली) येथे घडली आहे. सुशिला राम वंजारी (वय ३८, रा. मानेवस्ती वढु खुर्द (ता.हवेली) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. भर वस्तीत घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्याद देणारा मुलगा व प्रियसीला अटक करण्यात आली आहे.       विशाल राम वांजारी (वय १९) असे आरोपी मुलाचे नाव तर नॅन्सी गॅबरियल डोंगरे (वय २६) असे त्याच्या प्रियसीचे नाव आहे. या खूनाची फिर्याद देणारा मुलगाच खुनी निघाल्याने परिसरात खळबळ  पसरली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल राम वंजारी यांने प्रेयसी नॅन्सी गॅबरियल डोंगरे हीच्याशी संगनमत करून प्रेमात अडथळा ठरणाऱ्या सुशिला यांनी १५ हजार ५०० चोरले म्हणून भांडण केले.  रागाच्या भरात त्याने  सुशिला यांचा सोमवारी पहाटे धारदार शस्त्राच्या साहाय्याने खून केला. घटनेनंतर स्वत: पोलिस ठाण्यात जात विशालने आईच्या खुनाची फिर्याद दिली. तसेच शिवा देशमुख नावाच्या एक व्यक्ती खून करून फरार झाल्याचे खोटे सांगितले. पोलिसांनी वारंवार त्याच्याकडून जबाब घेतल्याने त्यात पोलिसांना तफावत आढळली. यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच आईचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. यानंतर या घटनेचा उलगडा झाला.  या कबुली जबाबानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 जिल्हा पोलिस आधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, विभागीय पोलीस आधिकारी डॉ सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शन खाली, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, मनोज तपसारे, नितिन आतकरे, केशव वाबळे, हनुमंत पडळकर, विक्रम जाधव व सहकार्यानी तपास केला तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Loni Kandलोणी कंदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकrelationshipरिलेशनशिप