तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच केला मुलीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 09:05 PM2021-10-24T21:05:23+5:302021-10-24T21:14:33+5:30

आईनेच आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला व त्यानंतर १३ वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत भरुन बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

The mother, who complained that her three-month-old daughter had been abducted, killed the girl | तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच केला मुलीचा खून

तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच केला मुलीचा खून

Next
ठळक मुद्देअनैतिक संबंधातून जन्मल्याने आईचे कृत्य येरवडा पोलिसांनी आणला खरा प्रकार उघडकीस

पुणे : तीन महिन्याच्या मुलीचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला व त्यानंतर १३ वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत भरुन बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत नातेवाईकांना काय सांगायचे या कारणावरुन तिनेच हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. येरवडापोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली असून १३ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती अशी, ही महिला मुळची अहमदनगरची असून मागील काही महिन्यांपासून ती येथे आपल्या भावाकड चित्रा चौकात रहायला आली आहे. ती घटस्फोटीत असून तिला एक १३ वर्षाचा मुलगा आहे. ३ महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता. शुक्रवारी सायंकाळी घरात झोपले असताना आपल्या ३ महिन्याच्या मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तिने येरवडापोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन चौकशीस सुरुवात केली. सायंकाळच्या वेळी ती झोपल्याचे सांगत होती. ती व तिच्या मुलाच्या बोलण्यात विसंगती दिसून आल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय वाढला.

चौकशीदरम्यान काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यानंतर अधिक चौकशीत या महिलेने ही मुलगी सतत रडत होती. रात्र रात्र जागवायची. अनैतिक संबंधातून तिचा जन्म झाला होता. मुलीबाबत नातेवाईकांत काय सांगायचे, यामुळे आपणच तिचे तोंड दाबून तिला जीवे ठार मारले व तिच्याच १३ वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत बांधून बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकून दिला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नदीत जाऊन शोध घेतल्यावर त्यांना तिचा मृतदेह आढळून आला. तो शवविच्छेदनाकरीता ससून रुग्णालयात पाठवून दिला. या अपहरणाच्या गुन्ह्यात मुलीची आईला अटक केली असून तिच्या १३ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले असल्याचे सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी सांगितले. तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याचे व तिच्याच भावाने खून केल्याची माहिती अगोदर सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रत्यक्षात पोलिसांनी दोघांकडे वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या तपासात आईनेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक विजयसिहं चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, किरण लिट्टे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, पोलीस अंमलदार तेजस भोसले, सिद्धाराम पाटील, अमजद शेख, शुभांगी चव्हाण, विष्णु ठाकरे, अनिल शिंदे यांनी हा तपास केला.

Web Title: The mother, who complained that her three-month-old daughter had been abducted, killed the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app