वडिलांकडे जायचा आग्रह धरणाऱ्या मुलीला आईने ठेवले दोन दिवस उपाशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 15:27 IST2019-12-20T15:26:52+5:302019-12-20T15:27:02+5:30
एका अल्पवयीन मुलीला आई व मावशीने चक्क दोन दिवस उपाशी ठेवले...

वडिलांकडे जायचा आग्रह धरणाऱ्या मुलीला आईने ठेवले दोन दिवस उपाशी
पुणे : वडिलांकडे जायचा आग्रह धरणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आई व मावशीने चक्क दोन दिवस उपाशी ठेवले. इतकेच नव्हे तर आईने तिला स्टीलच्या उलथण्याने मारहाण देखील केली. ही खळबळजनक घटना खडकी येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या आजीने फिर्याद दिली असून आई आणि मावशीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून नवरा बायकोमध्ये वाद सुरु होते. भांडणांचा ताण सहन न झाल्याने मुलीच्या आईने माहेर गाठले. पुढे काही दिवसांनी मोठ्या मुलीने मुलीने आपल्याला पप्पांकडे जायचे आहे. मला घरी राहायचे नाही. असा आग्रह आईकडे केला. मुलीच्या आग्रहाचा आईला व मावशीला राग आल्याने त्यांनी तिला स्टीलच्या उलथण्याने मारहाण के ली. इतकेच नव्हे तर मावशीने शिवीगाळ करुन दोन दिवस उपाशीदेखील ठेवले. तसेच चार दिवस अंघोळीकरिता पाणी दिले नसल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण कराळे करीत आहेत.