शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आई घराबाहेर, बापाचे नीच कृत्य; कोवळ्या जीवावर ८ महिने लैंगिक अत्याचार; पुण्यातील संतापजनक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 10:57 IST

आरोपीचे पत्नीसोबत भांडण झाल्याने पत्नी विभक्त राहत होती. तर घरात १४ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी वडील असे दोघेच राहत होते

- किरण शिंदे

पुणे - स्वारगेट लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नुकतेच घडले असताना पुण्यातून आणखी एक संताप आणणारा प्रकार उघडकीस आला. पत्नी माहेरी गेली असताना बापानेच १४ वर्षीय मुलीवर तब्बल आठ महिने लैंगिक अत्याचार केले. पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुलै २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधना बापाला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षे वयाची आहे, तर आरोपी बाप ४५ वर्षाचा आहे. आरोपीचे पत्नीसोबत भांडण झाल्याने पत्नी विभक्त राहत होती. तर घरात १४ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी वडील असे दोघेच राहत होते. सुरुवातीला जुलै २०२४ मध्ये आरोपीने मुलीला धमकी देत आणि मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. याबाबत कुठेही वाच्यता न करण्यास सांगत तिला धमकी दिली. त्यानंतर सतत हा प्रकार सुरू होता. दरम्यान नोव्हेंबर २०२४ मध्ये आरोपीची पत्नी घरी परत आली. मात्र पत्नी कामावर गेल्यानंतर त्याने पुन्हा हा प्रकार सुरूच ठेवला. फेब्रुवारी पर्यंत आरोपी स्वतःच्या मुलीसोबत जबरदस्ती करत लैंगिक संबंध ठेवायचा. 

दरम्यान दोन दिवसांपूर्वी बालहक्क समितीने नांदेड सिटी परिसरात अशा प्रकारचे कृत्य घडत असल्याची माहिती पुणेपोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर ६४(२)(फ (एम)६५(१),११५(२),३५१ (२) व Poxo ४(२),६,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आरोपी वडिलांना बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस