शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
7
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
8
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
9
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
10
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
11
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
12
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
14
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
15
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
16
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
17
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
18
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
19
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
20
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

मूत्रपिंड देत 'वात्सल्यसिंधू' आईने मुलाला दिले जीवदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 20:10 IST

मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेला २४ वर्षीय तरुण हा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. तो  ‘क्रॉनिक किडनी’ आजाराने ग्रस्त होता.  

पुणे : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचं स्थान खूप महत्वाचं असतं. कितीही जन्म घेतले तरी तिचं ॠण कुणीही फेडू शकत नाही. एका मुलाला याचा जिवंतपणीच प्रत्यय आला. आईने आपले मूत्रपिंड देऊन मुलाला पुन्हा एकदा जीवदान दिले.. या ‘वात्सल्यसिंधू आई’ च्या प्रेमपूर्ण कृतीने  मुलालाही नि:शब्द केले.   २४ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयात ही मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेला २४ वर्षीय तरुण हा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. तो  ‘क्रॉनिक किडनी’ आजाराने ग्रस्त होता.  त्यामुळे गेल्या ९ महिन्यांपासून त्याच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू होते.  तज्ञ डॉक्टरांनी त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असता त्याच्या ५२ वर्षीय आईने तिचे मूत्रपिंड दानाकरिता संमती दर्शविली.     महाविद्यालयीन तरुण असलेल्या रुग्णाचे वडील शिपाई म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे.  कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नव्हता म्हणून ससूनमध्ये  मूत्रपिंड प्रत्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ससूनमधील हे जिवंत दाता असलेले आठवे तर एकूण अठरावे मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले.  ससूनचे  अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले म्हणाले कुशल वैद्यकीय तज्ञ व अत्याधुनिक उपकरणांनी ससून सुसज्ज होत असल्यामुळे या शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांनी ससूनला देणगी देण्यासाठी पुढाकार घ्यावा.  ससूनला दिलेल्या देणगीवर ८० जी ची सुविधा उपलब्ध आहे.     अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात मूत्रपिंड रोग तज्ञ डॉ. सुरेश पाटणकर, डॉ.राजेश श्रोत्री, डॉ.अभय सदरे,  डॉ.शशिकला सांगळे, डॉ.निरंजन आंबेकर, डॉ.संदीप मोरखंडीकर, डॉ.धनेश कामेरकर, डॉ.हर्षद तोष्णीवाल, डॉ.शंकर मुंढे,डॉ. हृषीकेश कोरे  भूलतज्ञ डॉ. विद्या केळकर, डॉ.योगेश गवळी यांचा समावेश होता.  त्यांना कविता अभंग, फरीदा शेख, अनिता दिंडाल या परिचारिकांचे सहकार्य लाभले. अवयव प्रत्यारोपण समन्वयक अर्जुन राठोड यांनी मोलाची मदत केली. 

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटल