विश्रांतवाडी- अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत धानोरी रस्त्यावर एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
गुलाब साहेबराव मुरगुंडे(वय 60 रा. भैरव नगर धानोरी) यांचा या अपघातातमृत्यू झाला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुरगुंडे हे धानोरी रस्त्यावरील भरत ढाब्याजवळ मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात करून वाहन चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे मुरगुंडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
अपघात सकाळी लवकर झाल्यामुळे तसेच या रस्त्यावर जवळपास सीसीटीव्ही उपलब्ध नसल्यामुळे नेमका अपघात कसा झाला? कोणत्या वाहनाने केला? हे समजू शकलेले नाही. याप्रकरणी मुरगुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार म्हणून अज्ञात वाहन चालका विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Morning walk person death of a senior citizen in an unidentified vehicle collision, incident at Dhanori
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.