शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

दुचाकी धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 13:59 IST

मॉर्निंग वाँक’साठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ठळक मुद्देवानवडीतील घटना : गेल्या दहा दिवसांत तीन अपघात; तिघांचा गेला नाहक बळी

पुणे : शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या व्यक्तीला मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला.या अपघातात ज्येष्ठ नागरिक रघुनाथ शंकर बधे (रा. वानवडी) यांचा मृत्यू झाला असून दुचाकीस्वार अवनित विनोद भंडारी (वय ४०, रा. साळुंखे विहार) ही व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिवरकर रस्त्यावरील हॉटेल साई सागर येथून रघुनाथ बधे रस्त्याच्याकडेने चालत असताना फातिमानगर च्या बाजुने येणाऱ्या दुचाकीचालकाने (एमएच. १२. एमजे. ५३६०) मागून येऊन जोरात धडक दिली. त्यामुळे दोघेही जागेवर पडल्याने गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले असता रघुनाथ बधे यांचा मृत्यू झाला, तर चालक हा अतिदक्षता विभागात असून उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार हा दारूच्या नशेत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  अपघाताचा पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.मागील दहा-बारा दिवसांत शिवरकर रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले होते. यामध्ये प्रेमानंद पार्कसमोर दुचाकीस्वाराने पादचाºयाला धडक दिल्याने पप्या गुलाब भालेराव (वय ४०, रा. हडपसर) याचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच काही दिवसांनी रात्री भरधाव रिक्षा विशाल मेगा मार्ट येथील झाडाला धडकल्याने रिक्षाचालक यतिराज संतराम भिसे (वय २९ रा. हेवन पार्क, महंमदवाडी) याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शिवरकर रस्ता हा मृत्यूचा सापळा झाला असून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. .....मॉर्निंग वाँक’साठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणशिवरकर रस्त्यावर मागील काही दिवसांत पादचारी व रिक्षाचालकाचा मृत्यू होऊन दहा दिवस उलटले नसताना शुक्रवारी सकाळी पुन्हा भरधाव व दारूच्या नशेत असणाऱ्या दुचाकीचालकाने रघुनाथ बधे यांना धडक दिल्याने त्यांचाही मृत्यू झाल्याने वानवडीत मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये रस्त्याच्या बाजूने चालण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सकाळी बाहेर पडलेली आपली व्यक्ती सुखरुप घरी येईल ना, याकडेही घरचे लक्ष देऊन असतात, तर काहींना पहाटे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी बंधने घालण्यात येत असल्याचे या दहा दिवसांत दिसून आले आहे........... मदतीसाठी आले नाही कोणी... शिवरकर रस्त्यावरील हा अपघात इतका जोरात झाला होता, की मदतीसाठी कोणीही व्यक्ती पुढे जात नव्हती. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या प्रत्यक्षदर्शी डॉ. डिंपल व त्यांची मैत्रीण सकीना यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी नागरिकांना पुढे या व जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी विनवणी करीत होत्या, परंतु पुरुष नागरिक फक्त बघतच बसले होते, असे प्रत्यक्षदर्शी डॉ. डिंपल यांनी सांगितले. या दोन महिलांनी त्यांना होईल तेवढी मदत केली व दुचाकीचालकाच्या घरी फोन करून कळवले होते. ज्येष्ठ काकांना त्यांच्या ओळखीचे लोक येऊन घेऊन गेले.

टॅग्स :WanvadiवानवडीAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस