शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पुणेकरांपेक्षा झाडे जास्त... पण ठराविक भागच हिरवागार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 12:58 PM

पुणे शहरात माणसांपेक्षा झाडे जास्त असल्याची शुभवार्ता आहे

ठळक मुद्देभवानी पेठ उजाड : सहकारनगर-धनकवडीत गर्द झाडीपालिकेने सन २०१८-१९ च्या पर्यावरण अहवालात दिलेली माहिती

पुणे : महापालिकेच्या वतीने शहराचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल सन २०१८-१९ जाहीर केला आहे. यामध्ये जीआयएस प्रणालीद्वारे वृक्षगणना केली असून, यात पुणे शहरात माणसांपेक्षा झाडे जास्त असल्याची शुभवार्ता आहे. पालिकेने सन २०१८-१९ च्या पर्यावरण अहवालात दिलेली माहिती खरी असेल, तर पुण्यात तब्बल ४१ लाख ९४ हजार ६२३ झाडे डोलत  असल्याचे स्पष्ट झाले आहे. जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) आणि जीपीएस (वैश्विक स्थान निश्चिती) द्वारे झाडांची ही मोजदाद झालेली आहे. धनकवडी-सहकारनगर परिसर शहरात सर्वाधिक गर्द झाडीने नटलेला आहे, तर सर्वांत कमी झाडे भवानी पेठेत आहेत.पर्यावरण संदर्भातील सद्य:स्थिती मांडणारा अहवाल दरवर्षी सादर होतो. यात हवा, पाणी, ध्वनिप्रदूषणाचा आढावा घेतला जातो. ४१८ प्रकारांच्या वृक्ष प्रजाती आहे. यातल्या १११ प्रजाती दुर्मिळ वृक्षांच्या आहेत. सहकारनगर-धनकवडी १० लाख ५३ हजार १४४ वृक्ष, वडगाव शेरी-नगररोड, कोथरुड-बावधन परिसरात सर्वाधिक वृक्ष, तर कसबा-विश्रामबाग परिसरात ३२ हजार १६२ वृक्ष आहेत, तर भवानी पेठेत सर्वांत कमी १२ हजार ४७४ वृक्ष आहे...........शहरातील वृक्षगणनेची माहिती पुढीलप्रमाणे-एकूण वृक्षांची संख्या : ४१ लाख ९४ हजार ६२३वृक्षांची एकूण प्रजाती : ४१८सर्वांत जास्त संख्य असलेली वृक्ष प्रजाती : गिरिपुष्पउपयुक्ततेनुसार शहरातील वृक्षांची संख्याइमारती लाकूड     :     १३ लाख ५७ हजार ५८सरपण योग्य वृक्ष     :     ८ लाख ३५ हजार ९८७शोभेची झाडे     :     ५ लाख ६३ हजार ४१९औषधी झाडे     :     ४ लाख २५ हजार ८४४शहरातील फळधारी वृक्षांची संख्याआंबा : ४३ हजार ८०३नारळ : ४१ हजार २३७सीताफळ : १७ हजार ३५७जांभूळ : १४ हजार ८०७पेरू : १४ हजार ७६८...........दुर्मिळ वृक्षपुण्यात देशी-विदेशी १११ दुर्मिळ वृक्ष प्रजाती आहेत. यात गोरखचिंच, दालचिनी, शिवलिंगी (विदेशी), कुंभ, भोकर, मणीमोहर, दुरंगी बाभूळ, अजान, मेडशिंगी, अंजनी, काळा पळस, रुद्राक्ष, गुळवेल (देशी) आदी प्रजातींचा समावेश आहे....... 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका