Cyber Crime: लष्करात असल्याचे सांगत ६० हुन अधिक नागरिकांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 6, 2023 17:35 IST2023-05-06T17:35:10+5:302023-05-06T17:35:46+5:30
आतापर्यंत अनेक बनावट लष्करी ओळखपत्र, कॅन्टीन कार्ड, पॅन, आधार कार्ड, तीन डझनहून अधिक मोबाईल, २०६ सिम कार्ड आणि ७ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत

Cyber Crime: लष्करात असल्याचे सांगत ६० हुन अधिक नागरिकांची फसवणूक
पुणे : लष्करात सैनिक पदावर काम करत असल्याचे भासवून सोशल मीडियावरन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ३० वर्षीय एकाला मिलिटरी इंटेलिजन्सने ताब्यात घेतले आहे. बनावट कागदपत्रे दाखवून संजीव कुमार नावाच्या सायबर फसवणूक करणाऱ्याला याला भरतपूर येथून अटक करण्यात आली आहे. तसेच राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या पोलिसांच्या सहकार्याने आणखी ९ सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवकुमार असे अटक केलेल्याचे नाव आहे. मागील एक वर्षात या टोळीने ६० हुन अधिक नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे. दीपक पवार या सैनिकाची खासगी कागदपत्रे मिळवून त्यावरील फोटो मॉर्फ करून बनावट दाखले तयार केले. त्यांनतर सोशल मीडियावर खरेदी विक्रीसाठी विविध फोटो टाकून सैनिक असल्याचे भासवत नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर ऑनलाईन पैसे मागवून तांत्रिक अडचणी निर्माण करायचा. ओटीपी किंवा स्कॅन क्यूआर कोड शेअर करण्याची मागवून नागरिकांच्या खात्यातून पैसे काढून घ्यायचा. यामध्ये ६० हुन अधिक लोकांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुख्य आरोपीला सापळ्यात अडकवण्यात आले ज्यामुळे नंतर इतर अनेकांना अटक करण्यात आली. आतापर्यंत अनेक बनावट लष्करी ओळखपत्र, कॅन्टीन कार्ड, पॅन, आधार कार्ड, तीन डझनहून अधिक मोबाईल, २०६ सिम कार्ड आणि ७ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.