शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सहा हजारांपेक्षा अधिक घरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 20:25 IST

अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार

ठळक मुद्दे: पालिका रुग्णालयात एमआरआय, डायलिसीस व ऑक्सिजन प्रणाली उभारणा

पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खराडी, हडपसर व वडगाव खुर्दमध्ये उभारण्यात येणाºया ८ प्रकल्पांमध्ये ३० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ६ हजार २६४ सदनिका बांधण्यात येत आहेत. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या  दरात ही घरे उपलब्ध करून देण्यात येतील. पुणे शहरातील २१ रस्ते विकसित करण्यासाठी आवश्यक जागांच्या बदल्यात महापालिका एफएसआय, टीडीआर व क्रेडिट बॉण्ड देणार आहे. तसेच, काही रस्ते पीपीपीच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) माध्यमातून विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारने पुणे शहरातील ८ सविस्तर गृहप्रकल्प अहवालांना मान्यता दिली आहे. यातील खराडीत ७८६, हडपसरमध्ये ३४० व वडगाव खुर्दमध्ये १ हजार १०८ सदनिका बांधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.कोरेगाव पार्कमधून जाणारा बंडगार्डन ते मुंढवा पुलापर्यंतचा रस्ता, कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, खराडीतील रॅडिसन हॉटेल ते सर्व्हे नं. ६० दरम्यानचा रस्ता, खराडी बायपास ते खराडीगाव, खराडीतील सर्व्हे नं. ६० ते राजारामनगर, खराडीतील सर्व्हे नं. ४, ३८, ३९, ४०, ४१, खराडी दर्गा, खराडी डीपी रस्ता ते नगररस्ता, खराडी डीपी रस्ता ते पठारे चौक, खराडी बायपास ते बी. टी. कवडे रस्ता, खराडी रस्ता ते रेल्वे बायपास अशा एकूण ११ रस्त्यांच्या विकासासाठी २८ कोटींची तरदूत केल्याचे सांगितले.  .............................भूसंपादनासाठी ‘क्रेडिट नोट’चा नवा पर्याय पुणे महापालिका सार्वजनिक हितासाठी आरक्षित केलेल्या जागांच्या मोबदल्यात खासगी जागामालकांना एफएसआय, टीडीआर अथवा विशेष बाब म्हणून पैशांचा मोबदलाही देते. या पर्यायांबरोबरच आता जागेच्या मोबदल्यात रेडी रेकनरच्या दराप्रमाणे क्रेडिट बॉण्ड अथवा क्रेडिट नोटही जागामालकांना मिळवता येईल. या क्रेडिट नोटचा वापर करून संबंधित जागामालकाला मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) अथवा पालिकेची इतर देणी देता येतील, असे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक योगेश मुळीक यांनी सांगितले.०००

टॅग्स :PuneपुणेHomeघरYerwadaयेरवडाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका