शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी आली..! पीएमपीकडून आळंदी, देहूसाठी जादा बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 21:01 IST

पालखीनिमित्त पीएमपीमार्फत दरवर्षी जादा बस उपलब्ध करून दिल्या जातात.

ठळक मुद्दे२२ ते २६ जून या कालावधीत दररोज १४१ बसचे नियोजन प्रवासी संख्या किमान ४० असल्यास आवश्यकेतनुसारही बस सोडण्यात येणार

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत आळंदी व देहू येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. दि. २२ ते २६ जून या कालावधीत दररोज १४१ बसचे नियोजन करण्यात आले आहे.पालखीनिमित्त पीएमपीमार्फत दरवर्षी जादा बस उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानुसार यंदाही ही व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदीसाठी स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरी रोड येथून दररोज ११२ तर देहूसाठी पुणे स्टेशन, मनपा व निगडी येथून २९ बस सोडण्यात येणार आहेत. दि. २५ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आळंदीसाठी बसची व्यवस्था असेल. याशिवाय दि. २६ जून रोजी आळंदी येथून पालखी प्रस्थान होत असल्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेश्न, हडपसर, मनपा या ठिकाणाहून जादा २८ बसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियमितपणे संचलनात असणाऱ्या ९५ बस पहाटे ५.३० वाजल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बसस्थानकांवरून नेहमीच्या मार्गावर आळंदीसाठी भोससी व विश्रांतवाडीपर्यंत धावतील. याशिवाय प्रवासी संख्या किमान ४० असल्यास आवश्यकेतनुसारही बस सोडण्यात येणार आहेत. पुण्यातून पालखी प्रस्थानच्या दिवशी दि. ८ जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२ ते १ यादरम्यान थांबणार आहे. यादिवशी महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरुड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणी जाण्यासाठी बस असतील. तसेच कात्रज, कोंढव्याडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा सुरू राहील. पालखी सोहळा सोलापूर व सासवड मार्गाने प्रस्थान झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुक टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. हडपसर ते दिवेघाट हा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहणार असल्याने त्याकाळात बोपदेव घाट मार्गे वाहतुक सुरू ठेवली जाणार आहे. या मार्गावर स्वारगेट, पुणे स्टेशन व हडपसर येथून ६६ बसचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

 

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे