शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पाचशेहून अधिक सर्पमित्र करताहेत अंधश्रध्दा दूर ; साप शत्रू नव्हे मित्रच..!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 6:30 AM

कोरोनामुळे यंदा घरीच नागपंचमी साजरी करावी लागणार

पुणे : नागपंचमी निमित्त सर्वत्र नागाची पूजा केली जाते. पण यंदा कोरोनामुळे घरीच बसून हा सण साजरा करावा लागणार आहे. सापांविषयी समाजात आजही अनेक अंधश्रध्दा आणि गैरसमज पसरलेले आहेत. ते दूर करण्याचे काम शहरात पाचशेहून अधिक सर्पमित्र करीत आहेत. कोणाला साप आढळला तर सर्पमित्रांना बोलवावे, त्याला मारू नये, तरच खºया अर्थाने आपण नागपंचमी सण साजरा होईल. सापांना जीवदान मिळावे आणि त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी शहरात अनेक सर्पमित्र, संस्था काम करीत आहेत. त्यातील वाईल्ड अ‍ॅनिमल्स अ‍ॅन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे शहरात ठिकठिकाणी सर्पमित्र आहेत. या सोसायटीचे आनंद अडसुळ म्हणाले,‘‘ याही वर्षी नागपंचमीला पुजेसाठी येणारे साप गारूड्या कडून जप्त करण्याची मोहीम हातात घेतली आहे. नागपंचमीला जीवंत सापांची पुजा करण्याची अनेकांची इच्छा असते याचाच फायदा घेण्यासाठी गारूडी गावात व शहरात अवैधरित्या साप घेऊन फिरतात.  पुजेवेळी त्या सापांना बळजबरीने दुध सुद्धा पाजले जाते. साप हा पुर्णपणे मांसाहारी प्राणी असल्याने दुध त्याच्या पारंपरिक आहारात येत नाही. दुग्ध सेवनामुळे त्यातील बरेच साप मरण पावतात. हळद कुंकवामुळे सापांना अंधत्व येऊ शकते. 

साप मारल्यास, प्रदर्शन केल्यास ५ वर्षांचा कारावास  वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम कायदा १९७२ अनुसार नाग, धामण व  इतर साप अनुसूची १ आणि २ मध्ये समाविष्ट आहेत. त्यानुसार सापांना मारणे, पकडने, हाताळणे, त्यांना अवैधरित्या बंदीस्त करने तसेच त्यांचे प्रदर्शन करणाºया व्यक्तिस ( मग तो सर्पमित्र असो वा गारूडी ) ३ ते ५ वर्ष कारावास तसेच १०,००० ते १५,००० हजार रूपये दंडाची तरतूद आहे. ==============अन्नाची नासाडी करणाºया उंदीरासाठी साप हवा साप आठवड्याला साधारण एक जोडी उंदीर खातो. एक उंदिरांची एक जोडी वर्षा काठी साधारणत: ७०० ते ८०० पिल्लांना जन्म देते, जन्माला आलेलं पिल्लू पुढल्या दोन महिन्यातच प्रजननासाठी सक्षम होते. एक उंदीर महिन्याला ४०० ते ४५० ग्रॅम इतके धान्य खातो आणि तेवढेच साठवून देखील ठेवतो. एका जोडी उंदिरा मुळे होणारी पैदास आणि तिला लागणारे अन्न लक्षात घेतल्यास हा आकडा साधारण ७,६८० किलो. साप दर आठवड्याला एक जोडी उंदीर खाऊन फस्त करतो, असे प्राणिशास्त्राचे प्रा. भूषण वि. भोईर यांनी सांगितले.  ====================सापांविषयी पुर्वी खूप अंधश्रध्दा होती. ती आम्ही प्रदर्शन, कार्यशाळा असे विविध उपक्रम घेतले आणि जागृती केली. शहरात सुमारे ५०० हून अधिक सर्पमित्र कार्यरत आहेत. कुठे साप आढळला तर त्यांना फोन जातो. - अनिल खैरे, सर्पतज्ज्ञ =================सर्व साप विषारी नसतातसध्या २६०० सापाच्या प्रजाती असून, त्यातील ४५० विषारी असतात. यातील सुमारे २७० सापांचे विष मनुष्यासाठी अत्यंत घातक असते. फक्त २५ जाती या मनुष्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. =======================सापांचे मुख्य तीन प्रकार * बिन विषारी वाळा, भारतीय अजगर, दिवड, डुरक्या घोणस, मांडुळ, धामण, धुळ नागिन, कुकरी, कवड्या, नानेटी, तस्कर, गवत्या, * निम-विषारी माळीण, हरणटोळ, मांजटेरी रेतीला साप, * विषारी मन्यार, घोणस, चापडा, नाग, फुरसे, हिरवी घोणस, 

टॅग्स :PuneपुणेsnakeसापNag PanchamiनागपंचमीNatureनिसर्ग